गोव्यात येणार्‍या उद्योगांना सरकारचे साहाय्य असेल ः मुख्यमंत्री

.

गोव्यात येणार्‍या उद्योगांना सरकारचे साहाय्य असेल .
पणजी ः कौशल्य विकास हा युवांपर्यंत पोहोचेल हे पाहण्याची आवश्यकता आहे. यासाठी गोव्यात येणार्‍या कंपनींना सरकार सर्वतोपरी साहाय्य करे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
व्हिस्टिऑन कॉर्पोरेशनने पणजी येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
आम्हाला नाविन्याची आवश्यकता आहे. नवीन कल्पना, नवीन आव्हानांची गरज आहे. गोव्यात आलेल्या व्हिस्टिऑनसारख्या कंपन्यांमुळे युवा वर्गाला याचा लाभ होणार आहे. आम्ही अशा कंपन्यांचे स्वागत करतो व त्यांना साहाय्य करतो. गोव्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल बनवायचे असेल, तर सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. तरच हे शक्य आहे.
स्टार्टअप्सना वैद्यकीय, अन्न प्रक्रिया, सेवा आदी सेक्टरमध्ये जाण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते.
दळवळणाच्या उत्तम सोयीसुविधांमुळे गोवा हे उद्योगासाठी फायदेशीर ठरत आहे. गती शक्ती व्यासपीठाअंतर्गत मोपा विमानतळ बांधण्यात आला असून हा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असून जानेवारी महिन्यापासून कार्गो वाहतूक केली जाणार आहे. याशिवाय मुरगाव बंदर, रेल्वे तसेच रस्ता मार्गे वाहतूकीस गोवा उत्तम आहे.
व्हिस्टिऑनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन लवंदे यांचे गोव्यात आल्याबद्दल आभार मानताना ते म्हणाले की, व्हिस्टिऑनने मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व कनेक्टिव्हिटी सोल्युशन्समध्ये प्रशिक्षण व इंटर्नशिपला सुरुवात केली असून ही बाब प्रशंसा करणारी आहे.
व्हिस्टिऑन ही गतिशीलता उद्योगाला सेवा देणारी एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी असून ती वैयक्तिक वाहतुकीवर खोल परिणाम करणार्‍या तंत्रज्ञान डोमेनमध्ये सहभागी आहे. यात कनेक्टेड डिजिटल कॉकपिट व विद्युतीकरणाचा समावेश आहे.
तरुण प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी व्हिस्टिऑनने गोव्यात लक्षणीय गुंतवणूक केली आहे. सायबर सुरक्षा, अँड्रोईड आधारित इन्फोटेन्मेंट, ऑटोसार ड्रायव्हर जागरुकता प्रणाली, आणि जागतिक ग्राहक अनुप्रयोगांसाठी स्वायत्त वाहन उपाय या क्षेत्रात भरती करणे सुरूच ठेवले आहे.
जून महिन्यात व्हिस्टिऑनने पणजीतील ईडीसी पाटो प्लाझा येथे नवीन तांत्रिक केंद्राची सुरुवात केली. याची क्षमता ५० आहे. मागील दोन महिन्यांत आसन क्षमता १४० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
५० पैकी ३० हे युवा पदवीधर आहेत. व्हिस्टिऑनने त्यांना रायझर्स असे नाव दिले आहे. ते कंपनीच्या प्रारंभीच्या कार्यक्रमाचा भाग आहेत. या द्वारे त्यांना डायनामिक रियल टाईम वातावरणात त्यांची अभियांत्रिकी कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळत आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत गोव्यातील व्हिस्टिऑनच्या कर्मचार्‍यांची संख्या ७०-८० ने वाढण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्याचे प्रयत्न कायम ठेवताना याचाच भाग म्हणून त्यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, पाद्रे कॉसेसाव अभियांत्रिकी कॉलेज व आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
व्हिस्टिऑन इंडिया ऑपरेशन्सचे प्रमुख आशिष भाटिया म्हणाले की, गोवा केंद्र हे व्हिस्टिऑनच्या इतर तांत्रिक केंद्रांसोबत काम करेल. इन्फोटेन्मेंट, चालक जागरुकता प्रणाली व अन्य तंत्रज्ञान विकासाच्या बाबतीत साहाय करेल. आम्ही करियर प्रोग्राम (इंटर्नशिप कार्यक्रम) विकसित करण्यासाठी विद्यापीठांसोबत काम करणे सुरूच ठेवू. युवा तरुण पदवीधर आमच्या सॉफ्टवेअर व उत्पादन अभियांत्रिकी क्षमतांमध्ये योगदान देतील, अशी अपेक्षा बाळगू.
व्हिस्टिऑनची भारतात दोन दशकांपेक्षा अधिक काळ उपस्थिती आहे. देशातील अनेक वाहन निर्मात्यांसोबत त्यांनी काम केले आहे. बंगळुरू, चेन्नई, गोवा व पुणेमधील २ हजार कर्मचार्‌यांच्या कल्पना, नवकल्पना व वचनबद्धतेमुळे त्यांची वाढ झाली आहे. त्यांनी अलीकडेच कोईंबतूर व त्रिवेंद्रममध्ये पाऊल टाकले आहे.
व्हिस्टिऑनच्या संघांकडे जागतिक वाहन निर्मात्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाच्या जागतिक विकासामध्ये योगदान देण्यासाठी सॉफ्टवेअर तसेच उत्पादन अभियांत्रिकी क्षमता आहे.

व्हिस्टिऑनबद्दल माहिती
व्हिस्टिऑन ही जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. जी गतिशीलता उद्योगाला अधिक आनंददायक, कनेक्टेड व सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी समर्पित आहे. कंपनीचे व्यासपीठ हे सिद्ध, स्केलेबल हार्डवेअर व सॉफ्टवेअर सोल्युशन पुरवते. त्यामुळे ग्राहकांना डिजिटल, इलेकट्रिक व स्वायत्त उत्क्रांती सक्षम होण्यास मदत होते. व्हिस्टिऑनची उत्पादने ही उद्योगाच्या ट्रेंडशी धरून असून डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर्स, अँड्रोईड आधारित इन्फोटेन्मेंट सिस्टम डोमेन कंट्रोलर्स, प्रगत ड्रायवर साहाय प्रणाली व विद्युतीकरण यांचा यात समावेश आहे. कंपनीचे मुख्यालय मिशिगन येथील व्हॅन ब्युरेन टाऊन येथे आहे. १७ देशांमध्ये ४० पेक्षा अधिक सुविधांवर १० हजार कर्मचारी काम करतात. व्हिस्टिऑनने २.८ बिलियनची विक्री करताना २०२१ मध्ये ५.१ बिलियन नवीन बुकिंगची नोंद केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar