हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारी हिंदु जनजागृती समिती !*

.

 

 

*हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारी हिंदु जनजागृती समिती !*
हिंदु जनजागृती समितीचा द्विदशकपूर्ती सोहळा पणजी येथील श्री महालक्ष्मी देवस्थान सभागृह येथे रविवार, 16 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता संपन्न होत आहे. या निमित्ताने हा लेखप्रपंच.
7 ऑक्टोबर 2002 रोजी अर्थात् आश्विन शु. प्रतिपदा म्हणजे नवरात्रातील घटस्थापनेच्या शुभदिवशी देवतांचा अनादर रोखण्याच्या उद्देशातून हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. हिंदु जनजागृती समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदुसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. खरेतर एक संघटना म्हणून 20 वर्षांचा कालावधी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भगवंताच्या कृपेमुळे या दोन दशकांच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे अनेक आघात परतवून लावण्यात, तसेच अनेक आघातांची दाहकता कमी करण्यात समितीला यश मिळाले आहे. जेव्हा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही उच्चारणेही धाडसाचे होते, अशा काळात विरोधकांना न जुमानता समितीने हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. व्याख्याने, मेळावे, परिसंवाद, लेख, चर्चासत्र, ग्रंथ आदी माध्यमांतून हिंदु राष्ट्राची संकल्पना सुस्पष्टपणे जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आज यत्र-तत्र-सर्वत्र हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे. ‘हिंदु राष्ट्र पे चर्चा’ घडवण्यात समितीचे योगदान आहे.

*1. धर्मरक्षण :* म.फि. हुसेन या हिंदुद्वेष्ट्या चित्रकाराने कलेच्या नावाखाली हिंदु देवी-देवतांची, तसेच भारतमातेची नग्न आणि अश्लील चित्रे काढली होती. समितीने हुसेन यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभारले. त्यांच्या विरोधात देशभरात 1250 हून अधिक पोलीस तक्रारी केल्या. परिणामी हुसेन यांना भारत सोडून कतार या इस्लामी देशात पलायन करावे लागले. इतकेच नव्हे, तर म.फि.हुसेन यांच्या शेकडो चित्र प्रदर्शने समितीने सनदशीर मार्गाने बंद पाडली आहेत. लक्ष्मी बॉम्ब फटाक्यांच्या विरोधात जागृती करून समितीने देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे फटाक्यांवर असू नयेत, यासाठी अभियान राबवले. त्याशिवाय चित्रपट, दूरचित्रवावाहिनीवरील मालिका, नाटके, जाहिराती, वेब सीरीज आदी माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी यशस्वीपणे अभियान राबवले.

*2. हिंदुविरोधी कायद्यांना विरोध :* समितीने राष्ट्र आणि धर्म हिताला नख लावणार्‍या काळ्या कायद्यांनाही कडाडून विरोध केला. समितीने केलेला कडवा विरोध, तसेच व्यापक जनजागृती यांमुळे महाराष्ट्रातील साडेचार लाख मंदिरांवर फिरू पहाणारा सरकारी वरवंटा थांबला आणि मंदिर सरकारीकरण कायदा पारित होऊ शकला नाही. याशिवाय हिंदूंच्या धर्माचरणावर गदा आणणार्‍या जादूटोणाविरोधी कायद्याच्या मसुद्यातील 27 पैकी 15 हिंदुविरोधी कलमे कमी करावी लागली.

*3. राष्ट्रीय हिंदु आंदोलन :* राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात समिती गेली 10 वर्षे रस्त्यावर उतरूनही सनदशीर मार्गाने ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ करत आहे. या आंदोलनांमुळे हिंदुसंघटन साध्य होऊन काही देशविरोधी घटनांनाही चाप बसला आहे. आतंकवादाची शिकवण देणारा हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेवरील बंदी, नाईक याच्या ‘पीस टीव्ही’च्या प्रसारणावर बंदी, इस्लामी देशांतील पीडित हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रक्रियेला आरंभ आदी सूत्रे या आंदोलनांची महत्त्वाची फलश्रुती म्हणून सांगता येईल.

अशाच प्रकारे घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलणे, बंगालमधील हिंदूंना परंपरेप्रमाणे दुर्गा विसर्जन करण्याचा अधिकार मिळणे, हिंदु नेत्यांच्या हत्या, अवैध मशिदी, अवैध पशूवधगृहे यांना विरोध अशा हिंदुहिताच्या अनेक विषयांवर समितीने आंदोलन केले आहे.

*4. धर्मजागृतीपर उपक्रम :* धर्मजागृती झाली, तरच धर्मरक्षण होऊ शकते. त्या दृष्टीने समितीने धर्मजागृतीपर अनेक उपक्रम राबवले. समितीने धडाडीने ‘लव्ह जिहाद’ विषयी व्याख्याने, लेख, निवेदने, पीडित मुलींचे समुपदेशन आदींच्या माध्यमांतून जागृती केली. ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित केला. ‘लव्ह जिहाद’प्रमाणेच ‘हलाल जिहाद’ची भयावहता समितीने उघडकीस आणली. ‘हलाल जिहाद’ला अनुसरून समितीने सध्या आंदोलन आरंभले असून ग्रंथही प्रकाशित केला आहे.

*5. हिंदुसंघटन :* ‘संघे शक्तिः कलौयुगे’ अर्थात् कलियुगात संघटन हीच शक्ती आहे. जात-पात-पक्ष-संप्रदाय विरहित हिंदूंचे एक विशाल संघटन उभे रहावे; यासाठी समितीने खेडेगावांपासून महानगरांपर्यंत २ सहस्रहून अधिक हिंदु राष्ट्र जागृती सभा घेतल्या. समितीच्या आज 11 राज्यांमध्ये 325 हून अधिक ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेतले जात आहेत.

गोव्यामध्ये अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करण्याचे कार्य समिती करत आहे. देशभरातील जवळपास 250 हून अधिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ता या अधिवेशनाच्या माध्यमातून धर्मकार्याची दिशा ठरवून कालबद्ध प्रयत्न करत आहेत. हे अधिवेशन म्हणजे हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारे एक व्यासपीठ बनले आहे.

*6. मानबिंदूंचा सन्मान :* समितीच्या मोहिमेमुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी येऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाण्याच्या अभियानात यश मिळाले. शालेय अभ्यासक्रमातून होणार्‍या परकीय आक्रमांच्या उदात्तीकरणाच्या विरोधातही समितीने आंदोलन छेडले. परिणामी गोव्यात एन्सीईआर्टीच्या अभ्यासक्रमात केवळ 5 ओळींमध्ये शिकवला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता 5 पानांचा शिकवला जाऊ लागला आहे. याशिवाय गड-दुर्गांवरील अतिक्रमणाच्या विरोधातही समिती कृतीशील आहे.

*7. संस्कृतीरक्षण आणि पर्यावरणरक्षण :* संस्कृतीरक्षणाच्या दृष्टीकोनातून समितीने ‘डे’ संस्कृतीला विरोधी, ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना विरोध केला आणि हिंदु सणांमागचे अध्यात्म आणि शास्त्र लोकांपर्यंत पोचवले.
सोशल मीडिया, यू-ट्यूब, ट्वीटर, तसेच Hindujagruti.org हे संकेतस्थळ या माध्यमांतूनही समितीचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच स्थापना व्हावी, यासाठी ‘सामर्थ्य आहे चळवळीचे…’ या उक्तीप्रमाणे आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून समिती कार्यरत आहे. आपणही यथाशक्ती समितीच्या कार्यात सहभागी होऊन, तन-मन-धन-बुद्धी-कौशल्य यांचे हिंदु राष्ट्रासाठी योगदान द्या !

– *श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar