किआ ही ‘फिफा अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022™ साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार’

.

किआ ही ‘फिफा अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022™ साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार’

देशातील सर्वात वेगाने वाढणार्‍या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या किआ इंडिया ने फिफा ला त्यांच्या उत्पादन श्रेणीमधील 68 वाहनांचा पुरवठा केला आहे. ज्यामुळे अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022 मध्ये वाहतुकीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. 7 ऑक्टोबर 2022™ रोजी डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे झालेल्या वाहन हस्तांतर समारंभात किआ कॅरेन्सच्या 30 युनिट्स, किआ कार्निव्हलच्या 20 युनिट्स आणि किआ सेल्टोसच्या 18 युनिट्ससह एकूण 68 वाहने फिफा अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. या समारंभाला किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क आणि जेम यार्झा, संचालक, फिफा स्पर्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

किआ ही फिफा अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022™ साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार आहे. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय फुटबॉल संघ, पंच, सामना अधिकारी, प्रतिनिधी आणि इतर व्हीआयपींना नेण्यासाठी फिफा द्वारे किआ च्या सदर वाहनांचा वापर केला जाईल. किआ या संपूर्ण स्पर्धेत फिफा ला 24 तास रस्त्याच्या कडेला मदत देखील प्रदान करेल.

किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क म्हणाले, “फिफा अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022™ शी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार म्हणून संबद्ध असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. भारतात फुटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, ही भागीदारी येथे नैसर्गिकरित्या फिट झाली. फिफा टूर्नामेंट ला जगभरात लाखो फुटबॉल चाहते फॉलो करतात आणि अशा प्लॅटफॉर्मशी संलग्न केल्याने आम्हाला किया ला उत्साही लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचविता येईल. किआ आणि फिफा दीर्घकालीन भागीदार आहेत आणि भारतातील या कार्यक्रमाचा एक भाग असणे हा एक जणू विशेष विशेषाधिकारच आहे. खेळांच्या आवडीसह, किआ इंडिया सर्वांच्या गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करणारी जागतिक दर्जाची उत्पादने देऊन अशा जागतिक स्पर्धांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

जेम यार्झा, संचालक फिफा टूर्नामेंट म्हणाले, “किया ही बर्‍याच काळापासून फिफा ची विश्वासू भागीदार आहे आणि 2022™ च्या अंडर-17 महिला विश्वचषक भारतासाठी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही फारच उत्सुक आहोत. किआ ला आमच्या वाहतुकीच्या गरजा समजतात आणि ती अश्या इव्हेंटच्या यशस्वी ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आम्हाला विश्वास आहे की किआ सोबतची ही भागीदारी व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि फुटबॉलला जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.”

2007 मध्ये भागीदारी सुरू झाल्यापासून फिफा विश्वचषकासह™ अनेक कार्यक्रमांसाठी किआ ही फिफा ची अधिकृत प्रायोजक आहे. फिफा अंडर-17 महिला विश्वचषक भारत 2022™, 11 ते 30 ऑक्टोबर’22 दरम्यान भारतात होणार आहे आणि यावेळी खेळले जाणारे सामने नवी मुंबई, भुवनेश्वर आणि गोवा येथे होणार आहेत. द्वैवार्षिक युवा स्पर्धेची ही 7 वी आवृत्ती आहे आणि भारताद्वारे आयोजित करण्यात येणारी पहिली-वहिली फिफा महिला स्पर्धा आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar