जीएफएचा चेहरामोहरा बदलण्याचे वेल्विन मिनेझिस यांचे लक्ष्य

.

जीएफएचा चेहरामोहरा बदलण्याचे वेल्विन मिनेझिस यांचे लक्ष्य
मायकेल सेज यांच्यानुसार अनुभव हा असा धडा आहे. ज्यामुळे भविष्यातील ओझे कमी करणे शक्य आहे.
गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक ३० ऑक्टोबर रोजी नियोजित असून संघटनेला नवीन झळाळी प्राप्त करून देण्यासाठी अनुभव हा महत्त्वाचा ठरणार आहे. जीएएफएरुपी जहाजाला दिशा देण्यासाठी अनुभवी नाव म्हणजे जुझे वेल्विन मॅक्सिमो दी मिनेझिस हे आहे.
अध्यक्षपदासाठी उतरलेले मिनेझिस हे अनुभवी क्रीडा प्रशासक असून जीएफएच्या अंतर्गत कामकाजाची इत्यंभूत माहिती त्यांना आहे.
जीएफए कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी तीन कार्यकाळ (२०१०-१४, २०१४-१८ व २०१८-२२) पूर्ण केले आहेत. २०१६-१८ या काळात ते सरचिटणीस. तसेच एआयएफएफ स्टेटस कमिटी सदस्य (२०१२-१६) होते. २०१९ सालापासून ते स्पोर्टिंग क्लब दी गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गोवा वेल्हा स्पोर्टस् क्लबचे २०१५ सालापासून अध्यक्ष आहेत.
जीएएफसमोर सर्वांत मोठा मुद्दा हा आर्थिक आहे. असलेला फंड संपत चालला असून पुरस्कर्तेदेखील पाठ फिरवत आहेत. या परिस्थितीत मिनेझिस यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा चंग बांधला आहे.
‘जीएफएला राज्य सरकारच्या साहाय्याने गरज असून त्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. जीएफए व गोवा फुटबॉल विकास परिषद (जीएफडीसी) यांनी युवा फुटबॉलच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे. मी निवडून आल्यास काही मुख्य पुरस्कर्त्यांनी गुंतवणुकीची तयारी दशर्वली आहे, असे ते म्हणाले.
मिनेझिस पुढे म्हणाले की, जीएफएच्या मालकीची धुळेर येथे जागा असून ती सत्कार्यासाठी लावणे शक्य आहे.
‘मी काही भागधारकांशी बोललो आहे. त्या जागेचा विकास शक्य आहे. या द्वारे मिळालेल्या उत्पान्नामुळे जीएएफएला स्पर्धा आयोजन आदी उपक्रम राबवणे मदत शक्य आहे. स्वतःच्या निधीमुळे दीर्घकाळात जीएएएफला स्वतःच्या पैशाद्वारे भविष्यात स्वतः शाश्‍वत होणे शक्य आहे, असे मिनेझिस म्हणाले.
महत्त्वाचे म्गणजे निवडून आल्यास जीएफएला स्वतःचे क्लबहाऊज मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मिनेझिस म्हणाले. ‘जीएफए भवन’चे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जमिनीचा शोध घेण्यापासून प्रयत्न करणार असल्याचे मिनेझिस म्हणाले.
जीएफएमधील आपल्या उपलब्धीबद्दल सांगताना मिनेझिस म्हणाले की, जीएफए सरचिटणीसपदी असताना मी विविध प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी काम केले. जीएफएचे सर्व रेकॉर्ड कागदोपत्री तसेच डिजिटल स्वरुपात राहतील याची दक्षता घेतली.
यापूर्वी, खेळाडूंना वयोगटानुसार वार्षिक नोंदणी करावी लागत होती. त्यामुळे वयोगटानुसार त्यांचे नोंदणी क्रमांक बदलत होते. मी माझ्या कार्यकाळात ही परंपरा बंद करताना खेळाडूच्या जीएफएसोबतच्या पहिल्या नोंदणीवेळी खेळाडूंना परवाना देण्यास सुरुवात केली. जेणेकरून खेळाडूंना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत याचा लाभ होईल. फुटबॉल क्षेत्रातील अनेकांनी या कार्यात मला सहकार्य केले. दिवस-रात्र वेळ २४ तास वेळ न दवडता कार्य करत आम्ही २४ तासांत आमे लक्ष्य साध्य केले, असे वेल्विन अभिमानाने म्हणाले.
मिनेझिस म्हणाले की मला फुटबॉल क्लबांचा पाठिंबा आहे. ‘जीएफएच्या काही सदस्यांनीच मला निवडणूक लढविण्याचा आग्रह करताना माझा दीर्घ अनुभव लक्षात घेत माझी भेट घेतली.
मला सांगण्यास आनंद होत आहे की १८० पेक्षा अधिक क्लबांना माझ्यावर विश्‍वास आहे. सचिव म्हणून कार्य करताना मी खेळाडूंना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. आंतरग्राम फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळाडू आपल्या गावातील क्लबकडून खेळतील हे बारकाईने पाहिले. माझा अनुभव मी क्लबांना मदत करण्यास उपयोगात आणू शकतो, असे मिनेझिस म्हणाले.
फुटबॉलला पुढे नेण्याचा माझ्या स्वप्नाचा भाग म्हणून मी फुटबॉलमध्ये युवा विकासाला तसेच खेळाडू व रेफ्रींसाठीच्या सेवा योजनांमध्ये अधिक लक्ष घालणार आहे.
आम्हाला फुटबॉलमध्ये युवा विकास आवश्यक आहे. त्यामुळे ग्रासरुटपासून सुरुवात करावी लागणार आहे. खेळाडू, रेफ्री व क्लबांना मान्यता पाहिजे. प्लेयर ऑफ दी मंथ, क्लब ऑफ दी मंथ, रेफ्री ऑफ दी मंथ सारखे पुरस्कार दिले गेले पाहिजेत. जीएफएकडे खेळाडूंसाठी निधी आहे. परंतु, रेफ्रींसाठी तशी तरतूद नाही. या कार्यासाठी माझ्याकडे योजना असून जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर याचा लाभ होऊ शकतो, असे वेल्विन म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar