हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता ! – प्रा. मुकंद कवठणकर*

.

 

 

_

*हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता ! – प्रा. मुकंद कवठणकर*
पणजी, १६ ऑक्टोबर – समाजात भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढली आहे. हिंदूंनी जागृत होण्याची सध्या आवश्यकता आहे. हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षक प्रा. मुकुंद कवठणकर यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलींगकर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्याचा प्रारंभ प्रार्थना, श्लोक आणि शंखनाद झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
*आपले राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित आहे ! – शैलेंद्र वेलिंगकर, परशुराम सेना*
हिंदुत्वाची ५ गुणवैशिष्ट्ये आहेत. विश्वबंधुत्वाची शिकवण केवळ हिंदु धर्म देतो. सर्वांना सुखप्राप्ती व्हावी, अशी शिकवण हिंदुत्वाने दिली आहे. स्त्रीची, मातृत्वाची जिथे पूजा होते, तिला मान सन्मान दिला जातो, तिथे सर्व प्रकारची सुखे उपलब्ध होतात. आपले राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित आहे. आपल्या संस्कृतीला दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. हिंदूंचे धर्मांतर करणारे डॉमनिक सारख्या मिशनर्‍यांना मुळासकट उपटून काढले पाहिजे.
*यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करा ! – श्री. गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती*
देशात हलाल जिहाद राबवला जात आहे. देशात समांतर हलाल अर्थव्यवस्था राबवण्यात येत आहे आणि यामुळे भारतातील अर्थव्यवस्था खिळखिळी केली जात आहे. हिंदूंनी कुठल्या जीवनावश्यक वस्तूंना हलाल प्रमाणपत्र आहे ते पाहून यंदाची दिवाळी यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करावी. हिंदु राष्ट्राची लवकर स्थापना व्हावी यासाठी हिंदूंनी आपले दैनंदिन आचरण धर्माधिष्ठित असावे. आज निधर्मीवादाच्या नावाने अल्पसंख्यांकाचे लाड आणि हिंदूंवर अनन्वीत अत्याचार केले जात आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. श्री. भाई पंडित आणि श्री. राजीव झा यांचा प्रा. मुकुंद कवठणकर यांच्या हस्ते, तर श्री. मंदार गावडे यांचा सत्कार श्री. शैलेंद्र वेलींगकर यांनी केला. सोहळ्याची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुमेधा नाईक यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. सुशांत दळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली, तसेच हलाल जिहाद या विषयावर ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आली.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : 9326103278 )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar