*हलाल अर्थव्यवस्थेचा विरोध करण्यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना !*
*हलाल सर्टिफिकेशन हा हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’च ! – श्री. रमेश शिंदे*
हलाल हे केवळ धर्माशी संबंधित नसून ती इस्लामी आर्थिक व्यवस्था होत आहे. हलालच्या माध्यमातून विश्वावर संपूर्ण नियंत्रण करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतात पर्यायी समानांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. मांसापासून प्रारंभ झालेले हलाल आज औषधे, बांधकाम, कपडे, पर्यटन क्षेत्र, स्टॉक मार्केट इत्यादी सर्व क्षेत्रांना व्यापून जगातील २ ट्र्रलियन यु.एस. डॉलरची अर्थव्यवस्था झाली आहे. भारतात ४ लक्ष कोटी मांसाच्या व्यापारावर नियंत्रण स्थापन करण्यात आले आहे. भारतात FSSAi, FDA सारख्या प्रमाणपत्र देणार्या सरकारी संस्था असतांना धर्माच्या आधारावर स्वतंत्र प्रमाणपत्र देऊन पैसा संग्रहीत करणे अत्यंत घातक आहे. यातील पैशाचा आतंकवादी कारवायांसाठी उपयोग करण्यात येतो. हा हिंदूंवर लादलेला ‘जिझीया कर’च म्हणावा लागेल, *असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लेखक श्री. रमेश शिंदे यांनी केले.* ते बेंगळुरू येथील भारतीय विद्या भवन येथे झालेल्या हलाल विरोधी सम्मेलन, तसेच *‘हलाल जिहाद’ या इंग्रजी ग्रंथाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.*
*‘हलाल जिहाद’ हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट !* – श्री. चक्रवर्ती सुलिबेले
मागील काळात दैहिक आक्रमणे होती, नंतर मानसिक, बौद्धीक आक्रमणे झाली. आज या सर्वांपेक्षा अधिक अपायकारक अशा आर्थिक व्यवस्थेचे युद्ध चालले आहे. आज देवस्थानातील प्रसादासाठी उपयोगात आणण्यात येणारा गूळ देखील हलाल प्रमाणित झालेला दिसून येतो. हिंदूंच्या प्रत्येक आचरणावर प्रश्न उपस्थित करण्यात येतो; परंतु इस्लामिक आचरणावर कोणीही कोणताही प्रश्न उपस्थित करत नाही. हलालमुळे भारतातील मांसाच्या उद्योगात असणार्या दलितांचा बहिष्कार करण्यात येत आहे. या आर्थिक युद्धाला आपण सर्वांनी जागरूकतेने तोंड देणे आवश्यक आहे. ‘हलाल जिहाद’ हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट असून यंदाची दिवाळी ही ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करूया, असे आवाहन युवा ब्रिगेडचे संस्थापक चक्रवर्ती सूलिबेले यांनी केले.
*हिंदूंनी कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होऊन हलाल षड्यंत्राचा नाश करणे आवश्यक !* – श्री. किरण बेट्टदापूर
हलाल प्रमाणपत्र कोणतीही सरकारी यंत्रणा देत नसून ते खासगी मुसलमान संस्था देत आहेत. हलाल व्यवस्थेत मुसलमान असणे अनिवार्य आहे. हे भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे. चेन्नई येथे जैन बेकरीत जैन पद्धतीने आहार तयार करण्यात येतो. आम्ही अंडी वापरत नाही, असे सांगण्यात आल्यावर त्या बेकरीवर कारवाई करण्यात आली. असे असेल तर हलालच्या संदर्भात कारवाई का करू नये ? आपल्याला कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होऊन या षड्यंत्राचा नाश करावा लागेल, असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयातील अधिवक्ता किरण बेट्टदापूर यांनी केले.
आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)