पत्रकारितेवरील हल्ल्याचा फरेरा यांच्याकडून निषेध

.

पत्रकारितेवरील हल्ल्याचा फरेरा यांच्याकडून निषेध
पणजी ः हळदोणाचे कॉंग्रेसचे आमदार कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी आपले विधानसभेतील सहकारी व आमदार प्रवीण आर्लेकर यांनी व्हिडिओ पत्रकाराचा फोन हिसकावून घेण्याच्या कृत्रीचा निषेध केला आहे. या आठवड्याच्या सुरुवाताली झालेल्या या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला ठरतो. अशा प्रकारचे हल्ले हे खेदजनक तसेच निषेधार्ह आहेत. माझे सहकारी प्रवीण आर्लेकर यांनी केलेल्या या हल्ल्याचा मी निषेध करतो, असे फरेरा यांनी व्हिडिओद्वारे संदेश देत जारी सांगितले.
आमदाराची कृती ही भाजपला प्रश्‍न करणार्‍यांना कसे वागवले जाते याचे ध्योतक आहे.
सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यशैलीची ही सावली आहे. भाजपच्या किती नेत्यांना आमदाराची वागणूक पसंत पडलेली नाही? भाजपवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या त्यांच्या विचारधारेला विरोध करणार्‍या देशभरातील शिक्षित लोकांसाठी भाजपने ‘अरबन नक्सल’ या नवीन शब्दप्रयोग वापरात आणला आहे, असे फरेरा म्हणाले.
सत्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. दुसर्‍यावर आरोप करणारे भाजपमधील अनेक जण गुंड व दहशतवादी आहेत. दुसर्‍यांकडे बोटे दाखवून आपल्या गुंडगिरीच्या बळावर लोकांचा आवाज दाबून त्यांना देशद्रोही संबोधण्याचे कारस्थान आहे, असे फरेरा म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar