*एचडीएफसी बँक लिमिटेड*
३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीचे वित्तीय निष्कर्श (भारतीय जीएएपी
एचडीएफसी बँक लिमिटेडच्या शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत बँकेच्या (भारतीय जीएएपी) साठी ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही तसेच सहामाहीच्या वित्तीय निष्कर्शांना मान्यता देण्यात आली. या अकाऊंट्सना कंपनीच्या कायदेशीर लेखापरिक्षकांकडून परिक्षण करण्यापूर्वीची ही मान्यता आहे.
स्वतंत्र वित्तीय निष्कर्श :
३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीतील नफा आणि तोटा
बँकेच्या प्रमुख निव्वळ महसूल (ट्रेडिंग आणि मार्क टू मार्केट लॉसेस) मध्ये १८.३ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३० सप्टेंबर २०२२ रोजी रु २८,८६९.८ कोटींवर गेला जो ३० सप्टेंबर २०२१रोजी संपलेल्या तिमाहीत रु २४,४०९.७ कोटी होता. एकूण निव्वळ महसूल (व्याजातून मिळणारे निव्वळ उत्पन्न अधिक अन्य उत्पन्न) हे ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत रु २८,६१६.७ कोटी होते.
३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीतील व्याजातून मिळणारे निव्वळ उत्पन्न (मिळालेले व्याज वजा दिलेले व्याज) हे १८.९ टक्क्यांनी वाढून ते रु २१,०२१.२ कोटींवर पोहोचले असून ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत ते रु १७,६८४.४ कोटी होते. निव्वळ व्याजातून मिळालेले कोअर इंटरेस्ट मार्जिन हे एकूण मालमत्तेच्या ४.१ टक्के आणि व्याज प्राप्त होणार्या मालमत्तांवर आधारीत व्याज हे ४.३ टक्के आहे.
३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत अन्य उत्पन्नाचे चार घटक असून फी आणि कमिशन रु ५,८०२.९ कोटी (रु ४,९४५.९ कोटी हे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत होते) , एक्सजेंच आणि डेरिव्हेटिव्ह्ज चा महसूल रु ९४७.८ कोटी (मागील वर्षाच्या याच तिमाहीत ही रक्कम रु८६७.३ कोटी होती), विक्रीतून होणारे नुकसान/गुंतवणूकींचे पुर्नमुल्यांकन हे रु २५३.१ कोटी (गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ६७५.५कोटींचा लाभ) आणि अन्य उत्पन्ना मध्ये वसूली आणि लाभांश हा रु १,०९७.९ कोटी (गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ही रक्कम रु ९१२.१ कोटी होती). ट्रेडिंग आणि मार्क टू मार्केट लॉसेस मध्ये ३० सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत १६.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.