हिंदु जनजागृती समितीची म्हापसा येथे हलाल सक्तीविरोधी जागृती फेरी*_ *हलालमुक्त दीपावली साजरी करण्याचे हिंदूंना आवाहन*

.

_

_*हिंदु जनजागृती समितीची म्हापसा येथे हलाल सक्तीविरोधी जागृती फेरी*_

*हलालमुक्त दीपावली साजरी करण्याचे हिंदूंना आवाहन*

म्हापसा, २० ऑक्टोबर – हलालमुक्त दीपावली साजरी करून राष्ट्रीय सुरक्षेला हातभार लावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने २० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी म्हापसा मार्केट येथे आयोजित केलेल्या हलाल सक्तीविरोधी जागृती फेरीच्या माध्यमातून केले. या फेरीच्या माध्यमातून मार्केट परिसरातील व्यापारी वर्ग आणि ग्राहक यांचे हलालच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमामध्ये गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत (भाई) पंडित, महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, महासंघाचे खजिनदार श्री. नारायण राठवड, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जागृती फेरीला म्हापसा बाजाराच्या प्रवेशद्वारापासून प्रारंभ झाला. प्रारंभी समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी फेरीचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर म्हापसा बाजारात हलाल सक्तीविरोधी घोषणा देत आणि याविषयी फलक हातात घेऊन विक्रेते आणि ग्राहक यांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी दुकानांमध्ये हलाल सक्तीविरोधी जागृती करणार्‍या पत्रकांचे वितरण करण्यात आले. शेवटी फुलांचा बाजार येथे फेरीची सांगता झाली. ‘एक दो, एक दो, हलाल प्रमाणित वस्तू फेक दो!’ ‘बंद करा, बंद करा, हलाल प्रमाणित वस्तू बंद करा’, आदी घोषणा उत्स्फूर्तपणे देण्यात आल्या. फेरीच्या शेवटी फेरीत सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी फेरीला संबोधित केले. ‘भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’’ (FSSAI), तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र असा ‘अन्न आणि औषध प्रशासन’ विभाग (FDA) अस्तिवात असतांना सध्या भारतीय मुसलमानांकडून केवळ मांसच नव्हे, तर धान्य, फळे, सौयर्दप्रसाधने, औषधे, आदी उत्पादनेही इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ नामांकित असावी, अशी मागणी करण्यात येत आहे. देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ?’ असा सूर वक्त्यांच्या मार्गदर्शनातून उमटला.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar