Amazon.in वर ‘धनतेरस स्टोअर’ सह घरात समृद्धी
बेंगळुरू: सोने आणि दागिने खरेदी करण्यासाठी वर्षातील सर्वात शुभ मुहूर्ताच्या अगोदर, Amazon.in ने आज त्याच्या ‘धनतेरस स्टोअर’ ची घोषणा केली आहे. जे सोन्या-चांदीची नाणी, सणाचे दागिने, पूजा साहित्य, किराणा सामान आणि घरगुती वस्तूंपासून विशेष क्युरेट केलेल्या उत्पादनांची विस्तृत निवड करण्याची संधी देते. या शिवाय ग्राहक इथे आवश्यक वस्तू, गृहसजावट, इलेक्ट्रॉनिक्स, मोठी उपकरणे, स्मार्टफोन्स, अॅक्सेसरीज, डिजिटल गोल्ड आणि बरेच काही खरेदी करू शकतात.
इथे ग्राहक एमएमटीसी, सेन्को, मलबार गोल्ड आणि डायमंड्स, मिआ बाय तनिष्क, गिव्हा, जोयालुक्कास, पीसी चंद्रा, कल्याण ज्वेलर्सचे कॅनडेर, मेलोरा, हरशी, रेडमी ॲप्पल, सॅमसंग, इलेक्ट्रोलक्स आणि इतर अनेक ब्रँड्समधून निवडू शकतात.
‘धनतेरस स्टोअर’ हजारो उदयोन्मुख लघु आणि मध्यम व्यवसायांमधील उत्पादनांची सर्वात मोठी निवड उत्तम मूल्य आणि सोयीनुसार ऑफर करेल. सणासुदीला घरासाठीच्या सजावट उत्पादनांपासून ते छोट्या भारतीय व्यवसायांच्या भव्य पारंपरीक पोशाखांपर्यंत, ग्राहक भारतभरातील विक्रेते ऑफर करत असलेल्या सणाच्या निवडीतील सर्वोत्तम पर्याय शोधू शकतात.
ग्राहक त्यांच्या अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर (फक्त ॲन्ड्रॉइड) धनतेरस स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी ॲलेक्झा सह व्हॉइस नेव्हिगेशन देखील वापरू शकतात. युजर्स अॅपवरील अलेक्सा चिन्हावर टॅप करू शकतात आणि स्टोअरमध्ये निर्देशित करण्यासाठी “ॲलेक्झा, मला धनतेरस स्टोअरमध्ये घेऊन जा” असे म्हणू शकतात.
Amazon.in च्या ‘धनतेरस स्टोअर’ मधून ग्राहक निवडू शकतील अशा काही शीर्ष निवडी येथे आहेत. सर्व ऑफर आणि डील्स सहभागी विक्रेत्यांकडून आहेत.