विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावीत त्याचबरोबर काही अशी कौशल्य जी काळाची आड गेलेली आहेत

.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावीत त्याचबरोबर काही अशी कौशल्य जी काळाची आड गेलेली आहेत ज्यांचा आम्हाला विसर पडलेला आहे ती म्हणजे विणकाम, भरतकाम, फुलांची वेणी (फाती तयार करणे), नारळाचे पान (चुडत) कसे विणावे अशी विविध कौशल्य आहेत. या कौशल्य बरोबरच अन्य कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी म्हणून विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली चे शिक्षक श्री महेंद्र परब, शिक्षिका करिष्मा वायंगणकर व सहाय्यक शिक्षिका मयुरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 व 20 ऑक्टोबर 2022 रोजी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकास वर्गात कुमारी अक्षता किनळेकर यांनी ग्लास पेंटिंग, सलोनी नाईक यांनी टाकाऊ कपड्या पासून पाया पुसणी तयार करणे, सौ स्नेहा नाईक गावकर यांनी वीणकाम, श्रीमती रसिका हळणकर यांनी फुलांची वेणी (फाती तयार करणे) तर श्री महेंद्र परब यांनी नारळाच्या(चूडत) पानांपासून विणकाम कसे करावे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणे यांचे या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले तसेच श्री रोनित फडते, श्री हेरंब किनळेकर व श्री रामचंद्र जोशी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar