हलालमुक्त दीपावली साजरी करा ! – फोंडा येथे हलाल सक्तीविरोधी जागृती फेरीच्या माध्यमातून हिंदूंना आवाहन*

.

 

*हलालमुक्त दीपावली साजरी करा ! – फोंडा येथे हलाल सक्तीविरोधी जागृती फेरीच्या माध्यमातून हिंदूंना आवाहन*

फोंडा, २१ ऑक्टोबर – ‘एक दो, एक दो, हलाल प्रमाणित वस्तू फेक दो !’ ‘बंद करा, बंद करा, हलाल प्रमाणित वस्तू बंद करा !’, आदी घोषणा देत हलालमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या हलाल सक्तीविरोधी कृती समितीने फोंडा येथे आयोजित जागृती फेरीच्या माध्यमातून केले. समितीने श्री विठ्ठल मंदिर, वरचा बाजार ते तिस्क-फोंडा या मार्गावरून २१ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी काढलेल्या जागृती फेरीमध्ये हे आवाहन करण्यात आले. या फेरीमध्ये राष्ट्रीय युवा वाहिनीचे पदाधिकारी श्री. राजीव झा; हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक; जनशक्ती वेल्फेअर संघटना, कुर्टीचे श्री. धाकू कुर्टीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जागृती फेरीला श्री विठ्ठल मंदिर येथे श्रींच्या चरणी प्रार्थना करून प्रारंभ झाला. फेरीच्या वेळी फेरीत सहभागी झालेल्यांनी हातात ‘मुसलमानेतरांवर हलाल पदार्थांची सक्ती करणार्‍या ‘बर्गर किंग’, ‘मॅक्डोनाल्ड्स’, ‘केएफ् सी ’ आदी उपाहारगृहांवर बहिष्कार टाका ! अशा आशयाचे प्रबोधन करणारे फलक हातात घेतले होते. तिस्क-फोंडा येथे फेरीची सांगता झाली. ‘अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण’’ (FSSAI), तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र असा ‘अन्न आणि औषध प्रशासन’ विभाग (FDA) अस्तिवात असतांनाही केवळ मांसच नव्हे, तर धान्य, फळे, सौयर्दप्रसाधने, औषधे, आदी ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री सर्वत्र होत आहे. देशातील केवळ १५ टक्के लोकांना इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ?’ याविषयी फेरीच्या कालावधीत पत्रकांच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात आले.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar