पीएम रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे दिलेल्या व्यक्तींची माहिती मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक करावी – अमित पाटकर

.

पीएम रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे दिलेल्या व्यक्तींची माहिती मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक करावी – अमित पाटकर

पणजी – गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला “प्रधानमंत्री रोजगार मेळावा” हा आणखी एक जुमला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

काल राज्यात शासनातर्फे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमात काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली, त्यावर प्रतिक्रीया देताना, कॉंग्रेस अध्यक्षांनी सदर रोजगार मेळावा हे लोकांना फसवायचे नाटक होते असा टोला हाणला आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नियुक्तीपत्रे सुपूर्द केलेल्या विविध सरकारी खात्यांतील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल गोव्यातील सुशिक्षित तरुणांना जाणून घ्यायचे आहे. निवडलेल्या सर्व उमेदवारांची नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता यासह सर्व माहिती गोमंतकीयांना कळू द्या, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

कालच्या रोजगार मेळाव्यात टपाल खात्यासाठी काही लोकांची भरती झाली आहे. आठ ते दहा वर्षे काम केल्यानंतर अचानक सेवेतून काढून टाकलेल्या फोंड्यातील सात पोस्टमनचे काय झाले, असा सवाल अमित पाटकर यांनी केला असुन, मुख्यमंत्र्यांकडे त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.

माझ्याकडे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे की, जे लोक कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्यांना आता कायमस्वरूपी नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. हे जर खरे असेल तर मोदी सरकार नोकऱ्या देत नसून केवळ सेवा नियमित करत असल्याचा दावा अमित पाटकर यांनी केला.

सरकारने गोव्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, कालच्या “प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात” नियुक्ती पत्रे दिलेले उमेदवार कधी, कसे आणि कोणी निवडले हे सांगणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती तसेच स्थानीक वृतपत्रांतून प्रसिद्ध करावी. खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ द्या, असे अमित पाटकर म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar