*केरी न्यु इंग्लिश हायस्कुलची एकता दौकेरी न्यु इंग्लिश हायस्कुलची एकता दौड*
केरी पेडणे येथील न्यु इंग्लिश हायस्कुलमध्ये राष्ट्रीय एकटा दिवसाप्रीत्यर्थ एकता दौड आयोजित करण्यात आली होती.
शालेय व्यवस्थापक तातोबा तळकर आणि शालेय संस्थेचे कार्यकारी सदस्य विनोद नाईक यांनी झेंडा फडकावून एकता दौडीचे उदघाटन केले.
मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. तसेच लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
न्यु इंग्लिश हायस्कुल आणि गोल गोवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही एकता दौड घेण्यात आलेली. कार्यक्रम प्रमुख गुरुप्रसाद तांडेल यांनी एकतेची शपथ दिली. राष्ट्रगीताने एकता दिनाची सांगाता झाली.
फोटो;
केरी पेडणे येथे न्यु इंग्लिश हायस्कुल येथे एकता दिनानिमित्त आयोजित एकता दौडीचे झेंडा दाखवून उदघाटन करताना तातोबा तळकर व विनोद नाईक. सोबत मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी.