काणका बांध येथील ग्रामस्थांतर्फे भव्य दीपोत्सव संपन्न*

.

*काणका बांध येथील ग्रामस्थांतर्फे भव्य दीपोत्सव संपन्न*


काणका-बांध येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या दीपोत्सव या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रम येथील ग्रामस्थ तथा चारी डेकोचे मालक श्री. प्रवीण चारी यांनी पुरस्कृत केला होता. गावातील लहान मुले, मुली तसेच गावातील महिला यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलेला वाव मिळवून देणे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे आयोजन समितीतर्फे सांगण्यात आले. या कार्यक्रमात वयोगट 15 वर्षाखालील मुला मुलींसाठी चित्रकला, वेशभूषा व नृत्य अशा कलांचे प्रदर्शन व्हावे व त्यांच्यातील सूप्त गुण उदयास यावे म्हणून सदर सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. या सादरीकरणामध्ये गावातील पंधरा वर्षाखालील 60 मुलं व मुली यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात गावातल्याच महिलांना व मुलींना सूत्रसंचालनाची संधी देण्यात आली होती. ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या पेलली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवोली मतदारसंघाच्या आमदार श्रीमती दिलेयला लोबो यांनी केले. याप्रसंगी श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर, श्री. संजय वालावलकर, वेरला काणका पंचायतीच्या सरपंचा सौ. दीपाली बीचोलकर,
वेरला काणका पंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकच्या पंच सदस्य सौ. आरती प्रवीण चारी, या पंचायतीचे इतर पंच श्री. मोहन दाभाळे, श्री. अशोक आर्लेकर, श्री. विश्वास आरलेकर, वार्ताहर श्री. गिरीश मांद्रेकर आदि मान्यवर उपस्थित होते. तदनंतर शिवोली मतदारसंघाच्या आमदार श्रीमती दिलेयला लोगो यांनी समायोजित भाषण केलं स्वागतपर उद्देश श्री. महेश कोरगावकर, तर आभार सौ. आरती प्रवीण चारी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन सौ.माया कामत यांनी केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आर्या महेश कोरगावकर, कु. तितिक्षा दिलीप कोरगावकर, कु. रुतवा महेश कोरगावकर, कु. रिध्वी राकेश कोरगावकर, कु. तृषा दिलीप पेडणेकर, कु. रिया रितेश लांजेकर व कु. श्रवण काणेकर यांनी केले. आपली कला सादर करून व उत्कृष्ट सूत्रसंचालन करून सर्व मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

दिनांक 29 ऑक्टोबर 2022 या दिवशी पंधरा वर्षाखालील मुला-मुलींनी सादर केलेल्या कलेसाठी आयोजकांनी त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच 2021- 2022 या शैक्षणिक वर्षात गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावी परीक्षेत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी गौरविण्यात आलेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे, रिध्वी राकेश कोरगावकर, चैताली अमर उसापकर, सिद्धी संजय पिळणकर, तरुण समीर लांजेकर, तनय विशाल धावरे, क्रिश गोकुळदास मांद्रेकर,प्रीती सुरजपुरी गोस्वामी, आयुष पांडुरंग नाईक अशी आहेत. तर बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. कु. श्रावणी सुशांत नार्वेकर, कु.केदार शेखर उसपकर, कु. रोहित प्रभू सोपान अशी आहेत.
तदनंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, आकाश कंदील स्पर्धा, पाककला स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा काणका-वेर्ला पंचायत पुरती मर्यादित होत्या. यात आकाशकंदील स्पर्धेचे दोन गटात विभाजन करण्यात आले होते. एक गट वेरला काणका पंचायतीचा प्रभाग क्रमांक एक पुरता मर्यादित तर दुसरा गट वेरला काणका पंचायतीचे इतर प्रभाग. त्याचप्रमाणे पाककला स्पर्धा खालीलप्रमाणे होती. एक गाजरा पासून बनवलेला गोड पदार्थ व दुसरी कडधान्य यापासून बनवलेले दागिने अशा पाककलेच्या दोन स्पर्धा घेण्यात आल्या.मात्र रांगोळी स्पर्धा चतुर्थीच्या दिवसात घेण्यात आली होती व या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री सुरेंद्र शेटये यांनी काम पाहिले होते. या स्पर्धेत एकूण १४ स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सौ. प्राची प्रदोष केरकर, दुसरे पारितोषिक कु. शिवानी सुरज आरोंदेकर तर तिसरे पारितोषिक सौ. सोनम अमय कोरगावकर यांनी पटकावले. वेरला काणका पंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकसाठी मर्यादित आयोजित आकाश कंदील स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीसे कु. नृतिक आरोंदेकर, श्री. रोशन मोरजकर व सौ. क्रांती कोरगावकर यांना मिळाली तर या स्पर्धेच्या मुख्य बक्षिसात प्रथम बक्षीस सौ. सोनम कोरगावकर, द्वितीय बक्षीस श्री. संतोष साळगावकर आणि तृतीय बक्षीस कु. तृषा पेडणेकर यांना प्राप्त झाली. वेरला काणका पंचायतीच्या इतर प्रभागांसाठी आयोजित आकाशकंदील स्पर्धेत कु. शिल्पा सोसे, श्री. मंदार मांद्रेकर, श्री. दिनेश चारी यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली तर मुख्य बक्षिसात प्रथम बक्षीस कु. सुयश लिंगुडकर, द्वितीय बक्षीस कु. अनिता भगत आणि तृतीय बक्षीस कु. साईराम भगत यांना मिळाली. या स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर श्री. तुषार चारी यांनी परीक्षकाचे काम पाहिले होते. पाककला स्पर्धेत गाजरा पासून बनवलेल्या गोड पदार्थासाठी सौ. प्रवीण शिरगावकर, सौ. सोनम अमेय कोरगांवकर, स्वीटी टिक्के यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली, तर मुख्य बक्षिसांमध्ये कु. नृतिक आरोंदेकर यांनी प्रथम बक्षीस पटकावले, सानिया शेख हीने द्वितीय तर सौ. जोत्स्ना कोरगावकर यांनी तृतीय बक्षीस पटकावले.
“कडधान्यापासून बनवण्यात आलेले दागिने”, या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीसे सौ. श्रद्धा कोरगावकर, श्वेता मोरजकर व रिध्वी कोरगावकर यांना मिळाली तर मुख्य बक्षिसामध्ये सौ. वैदेही नार्वेकर प्रथम बक्षीस, कु. नृतिका आरोंदेकर द्वितीय बक्षीस, तर सौ. सोनम अमेय कोरगावकर यांना तृतीय बक्षिस मिळाले. या स्पर्धेत एकूण ४३ स्पर्धकांनी भाग घेतला होता, तर परीक्षकाचे काम सौ. रूपाली गावंढळकर आणि सौ. सुजाता नाटेकर यांनी पाहिले. मान्यवरांच्या हस्ते या दिवशीही दीपप्रज्वलन झाले व नंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी शिवोली मतदार संघाचे माजी आमदार व गोवा राज्याचे माजी मंत्री श्री. दयानंद मांद्रेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच निवृत्त प्राचार्य अनिल सामंत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ निहारिका नारायण मांद्रेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच थीवीचे माजी आमदार श्री. किरण कांदोळकर,
जिल्हा परिषद सदस्य
सौ. कविता किरण कांदळकर, वेरला काणका पंचायतीच्या स्वयंपूर्ण मित्र सौ. गौतमी परमेकर, सौ. संध्या टोपले, वेरला काणका पंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकच्या पंच सदस्य सौ. आरती प्रवीण चारी, श्री सिद्धपुरुष नारायण देव देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर, पंच श्री. अशोक आर्लेकर, श्री. मोहन दाभाळे, श्री. नारायण मांद्रेकर, श्री. हनुमंत कोरगावकर, श्री. रमेश कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुणे येथे साहित्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोव्याचे साहित्यिक, लेखक, कवी तसेच निवृत्त प्राचार्य श्री. अनिल सामंत यांचा श्रीफळ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन शिवोलीचे माजी आमदार व माजी मंत्री श्री. दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचा उद्देश देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर यांनी सांगितला, तर आभार सौ. आरती चारी यांनी मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या कोरगावकर, प्रतीक्षा कोरगावकर, रिया लांजेकर, तृषा पेडणेकर, ऋत्वा कोरगावकर, श्रवण काणेकर, रिध्वी कोरगावकर व शैवी मांद्रेकर यांनी केले. तद्नंतर “कलाझंकार” हा वाध्यवृंद कार्यक्रम होऊन भव्य अश्या *दीपोत्सवाची* सांगता झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar