खोर्ली म्हापसा येथील अखिल गोवा किल्ला सजावट स्पर्धेत ” श्री सिद्धिविनायक मंडळ – वन डिचोली” प्रथम.

.

खोर्ली म्हापसा येथील अखिल गोवा किल्ला सजावट स्पर्धेत ” श्री सिद्धिविनायक मंडळ – वन डिचोली” प्रथम.

खोर्ली म्हापसा येथे श्री सातेरी देवीच्या वार्षिक पालखी उत्सवानिमित्त उमेदी मंडळ, खोर्ली म्हापसा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 5वी अखिल गोवा किल्ला सजावट स्पर्धेत श्री सिद्धिविनायक मंडळ – वन डिचोली” प्रथम क्रमांक प्राप्त केला. दुसरा क्रमांक ” सातेरी नवयुवक मंडळ – खोर्ली म्हापसा” यांना मिळाला, तृतीय क्रमांक “आम्ही मावळे – डिचोली” यांना देण्यात आला.
तर “वडेश्र्वर बॉईज – डिचोली” “ओम शिवाय बॉईज – म्हापसा” “प्रथमेश राऊत डिचोली” ह्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
ह्या स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, परीक्षक उदय चारी , स्नेहल शेट्ये व अमिश गावकर उपस्थिती होते.
नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर ह्यांनी गोव्याच्या विविध भागातून उपस्थित स्पर्धकांचे तसेच ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या उमेदी मंडळाचे कौतुक केले. उमेदी मंडळ सातत्याने गेल्या १७ वर्षा पासून अशा विविध स्पर्धा ह्या पालखी उत्सवाच्या दिवशी आयोजित करून खोर्ली भागात उत्साहाचे वातावरण निर्माण करत असऱ्याचे नमूद केले.
समारंभाचे सूत्रसंचालन नगरसेवक साईनाथ राऊळ ह्यांनी केले तर उमदी मंडळाचे सदस्य अमित वेंगुर्लेकर ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar