म्हापसा येथे हलालविरोधी कृती समितीची स्थापना*

.

 

 

*म्हापसा येथे हलालविरोधी कृती समितीची स्थापना*
म्हापसा, दि. ४ नोव्हेंबर – समांतर अशी हलाल अर्थव्यवस्था निर्माण करून राष्ट्राच्या आंतरिक सुरक्षेला धोका निर्माण केला जात आहे. हलाल अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी म्हापसा येथे हलालविरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. मरड, म्हापसा येथील तुळशीराम सभागृह येथे म्हापसा परिसरातील व्यापारी वर्गासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांनी राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हलालविरोधी कृती समितीच्या स्थापनेच्या आवाहनाला उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ॐ च्या गजरात अनुमोदन दिले.
कार्यक्रमात प्रारंभी राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने आरंभलेल्या कार्याविषयी माहिती दिली. तत्पूर्वी राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी तुळशीराम सभागृह, मरड, म्हापसा येथे सकाळी महिला वर्ग, म्हापसा परिसरातील मंदिर विश्वस्त, गोमंतक मंदिर महासंघ आणि पत्रकार यांच्याशी निरानिराळ्या बैठकींच्या माध्यमातून संवाद साधला.

*हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरा ! – श्री रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*
राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी महिला वर्गाशी वार्तालाप करतांना पुढीलप्रमाणे आवाहन केले. आज केवळ मांसच नव्हे, तर धान्य, फळे, सौदर्यप्रसाधने, औषधे आदी हलाल नामांकित जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठेत विक्री होत आहे. भारत सरकारचे ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) आणि स्थानिक सरकारचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (FDA) खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्याची शासकीय व्यवस्था असतांना ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ यांसारख्या मुसलमान संघटनांकडून जीवनावश्यक वस्तूंची आयात, निर्यात आणि विक्री यांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ बंधनकारक केले जाते. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. राजश्री गडेकर यांनी केले. या वेळी काणका-वेर्ला पंचायतीच्या माजी सरपंच सौ. अमिता कोरगावकर, उद्योजक सौ. कीर्ती कोरगावकर, अधिवक्त्या सौ. रोशन सामंत आदींची उपस्थिती होती.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य, समन्वयक*
हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : 9326103278 )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें