म्हापसा वाताहार
नाथ पै मेमोरियल शैक्षणिक संस्थेच्या म. ज्योतिराव फुले हायस्कूल कोलवाळ आणि विद्यानिकेतन हायस्कूल कलंगुट मधील निवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल सभागृहात संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या हस्ते विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक रोशन सावंत तसेच महात्मा फुले हायस्कूल च्या शिक्षिका सुमित्रा आरसेकर व राजक्षी फडते यांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रेमानंद देसाई, गुरुनाथ नाईक पराग नाईक हे संस्थेचे पदाधिकारी, म. फुले हायस्कूल च्या मुख्याध्यापिका वर्षा परब, विद्यानिकेतन हायस्कूलला प्रमुख शिक्षिका वर्षा भिसे उपस्थित होते. यावेळी मौसमी नारूलकर, कृपा परब, वेदा देसाई, रशमी पासैकर, देवयानी, अस्मिता शिरसाठ, रुपाली पेडणेकर, यांनी भाषणे झाली.
रोशन सावंत, सुमित्रा आसैकर, राजक्षी फडते यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा देसाई यांनी केले वर्षा परब यांनी स्वागत केले तर वर्षा भिसे यांनी आभार मानले
फोटो