लिंगेश्वर पालये या पेडणे तालुक्यातील नाट्य,कला,क्रीडा,शिक्षण अशा विविध  क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या सदस्यांनी यंदाची आपली पदभ्रमन व इतिहास विषयक अभ्यास मोहीम पुण्यापासून ३० की.मी.अंतरावर असलेल्या स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे पावन झालेल्या कोंढाणा  अर्थात सिंहगड सर करून पार पाडली

.
   हरमल वाताहार
लिंगेश्वर पालये या पेडणे तालुक्यातील नाट्य,कला,क्रीडा,शिक्षण अशा विविध  क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या सदस्यांनी यंदाची आपली पदभ्रमन व इतिहास विषयक अभ्यास मोहीम पुण्यापासून ३० की.मी.अंतरावर असलेल्या स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे पावन झालेल्या कोंढाणा  अर्थात सिंहगड सर करून पार पाडली. या मोहिमेत एकूण १६ सदस्य यंदा सहभागी झाले होते. तसेच या मोहिमे अंतर्गत परळीचा सज्जनगड, पुण्यातील पेशव्यांची राजधानी असलेला शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेलेला व ज्या महालात शाहिस्तेखान यांची महाराजांनी बोटे छाटली तो लालमहाल, दगडू शेठ हलवाई गणपती आदींचेही दर्शन घेतले.
 यावेळी त्यांनी गडाच्या पायथ्याशी गाडी पार्क करून तेथून . “छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय “अशा घोषणा देत गडाच्या पायऱ्या  चढत जमिनीपासून 760 मीटर उंच आणि समुद्रसपाटीपासून 1312 मीटर उंच हा सिंहगड सर  केला.संपूर्ण गडावरील भग्ना अवस्थेतील विविध इतिहास कालीन वास्तूंचे अवशेष पाहून त्यांची ऐतिहासिक  माहिती जाणून घेतली. पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा आणि दिंडी दरवाजा यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत  स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी मंदीर, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ तसेच अर्ध पुतळा ,त्यांच्या जीवनावरील महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित साकारलेले शिल्प, वेगवेगळी आयुधे चालविणाऱ्या मावळ्यांचे साकारलेले पुतळे,तानाजी कडा जिथून अमावस्येच्या काळाकुट्ट रात्री मुठभर मावळ्यांनीशी गड चढून उदयभान राठोड सारख्या कडव्या मोगली सरदाराशी  झुंज घेतली  तो कडा जवळून पाहिला. तसेच उदयभान राठोड यांचे थडगे, जिथे गांधी टिळक यांची भेट झाल्याचे इतिहास सांगतो तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा बंगला, आदी वास्तू पाहून हे सदस्य पुढच्या प्रवासास निघाले.
सज्जनगडावरील रामदास स्वामी यांची समाधी,त्यांच्या वापरातील जुन्या काळातील भांडी आदी वस्तू, श्रीभवानी देवी मंदिर, पाण्याचे हौद, तेलाच्या घाण्याचे अवशेष,पाहीले.
पुण्यातील पेशव्यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला शनिवारवाडा ,त्यातील त्यांच्या वास्तूचे अवशेष, वास्तुकलेचा नमुना,यांचे दर्शन घेतले.
इतिहास कालीन स्थापत्यकला रचनेतून निर्माण झालेले वेगवेगळे नमुने, वेगवेगळी दालने, बुरुज,स्तंभ, महाद्वार, कोठारे, मंदिरे, त्यांच्या रचनांचे नमुने व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत व इतिहासातील पाने उलघडवून महान राजाच्या व त्याच्यासाठी मरायला मागे पुढे न पाहणाऱ्या त्यांच्या शिलेदारांच्या  पराक्रमाचे गोडवे सांगणाऱ्या किल्ल्याचे दर्शन घेऊन शिव सामर्थ्याच्या गाथेने, भारावलेले हे युवक रविवारी ३० ऑक्टोबर रोजी  परतीच्या वाटेकडे निघाले. येता येता वाटेत स्वच्छतेचे प्रति असलेले प्रति श्रीबालाजी मंदिराचे दर्शन घेऊन कोल्हापूर मार्गे ही सारी मंडळी गोव्यात येण्यासाठी निघाली.
यापूर्वी या संस्थेच्या सदस्यांनी ज्या ऐतिहासिक विषयावर आधारित नाटकांची निर्मिती केली त्याला अनुसरून त्या त्या किल्ल्यांचे दर्शन घेण्याची मोहीम राबवली होती. या उपक्रमांतर्गत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अलिबागचा जंजिरा, कोल्हापूरचा पन्हाळगड अशा गड किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.
दरम्यान या संस्थेने यंदा नरेंद्र नाईक यांच्या कोंढाण्याचा सिंह या नाटकाची निर्मिती केली असून येत्या एप्रिल महिन्यात या संस्थेचे कलाकार हे नाटक पालयेत सादर करणार आहेत त्यानिमित्ताने यंदा ही सिंहगड दर्शनाची मोहीम संस्थेने आखल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देविदास तीलवे यांनी दिली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar