सम्राट क्लब म्हापसा यांनी आयोजित केलेल्या पणती आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक सवैश गावडे याने पटकावला तर दुसरा व तिसरा क्रमांक  अनुक्रमे नीलेश मापारी व मनय सोनार याना मिळाला

.
सम्राट क्लब म्हापसा यांनी आयोजित केलेल्या पणती आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक सवैश गावडे याने पटकावला तर दुसरा व तिसरा क्रमांक  अनुक्रमे नीलेश मापारी व मनय सोनार याना मिळाला. सोनम मराठे, तेजा वेलिंगकर, स्नेहा पावसकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रगती इंगळे, दिशा मळीक, वैष्णवी व शुभ्र ाा राणे याना हि बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून चेतन रायकर यांनी काम पाहिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महारुद संस्थान चे अध्यक्ष गोविंद शिरोडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की दिवाळी हा सर्वत्र प्रकाश देणारा सण आहे, सर्वाना प्रकाशमय करून उजेडात आणणारा आहे.
यावेळी सम्राट क्लब म्हापसा चे अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर, सचिव सुब्राय चोडणकर, खजिनदार रितेश रायकर, प्रकल्प अधिकारी हरीश नास्नोडकर, गटाअधक्ष संदीप वालावलकर, माजी अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर तसेच सदस्य नितीन नेवगी, योगेश हिरवे, विनोद मळीक, प्रकाश धुमाळ, चेतन रायकर, व अमर परीकर उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. हरीश नास्नोडकर यांनी सुत्रसंचालन केले तर सचिव सुब्राय चोडणकर यांनी आभार मानले
पणती आरास स्पर्धेत सहभागी चंद्रकांत आमोणकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar