हिंदु जनजागृती समितीचे द्विदशकपूर्ती अभियान फोंडा येथे हलालविरोधी कृती समितीची स्थापना

.
हिंदु जनजागृती समितीचे द्विदशकपूर्ती अभियान
फोंडा येथे हलालविरोधी कृती समितीची स्थापना

फोंडा, ९ नोव्हेंबर – समांतर अशी हलाल अर्थव्यवस्था निर्माण करून राष्ट्राच्या आंतरिक सुरक्षेला धोका निर्माण केला जात आहे. हलाल अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी फोंडा येथे हलालविरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. विश्व हिंदु परिषद सभागृह येथे हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांनी राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केलेल्या हलालविरोधी कृती समितीची स्थापना करण्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून अनुमोदन दिले.
राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून हलाल अर्थव्यवस्था उभी करणे हे एक जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar