अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पामध्ये आले पेपर मून; भारतात पदार्पण Orफोर्ट पेपर मूनचे भारतात पदार्पण, ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पामध्ये सुरुवात

.

अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पामध्ये आले पेपर मून; भारतात पदार्पण
Orफोर्ट
पेपर मूनचे भारतात पदार्पण, ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पामध्ये सुरुवात

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२२: भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) ने गोव्यात पेपर मून हे इटालियन रेस्टोरंट सुरु केले आहे. अस्सल इटालियन खाद्यपरंपरेला जिवंत साकार करणाऱ्या या ब्रँडचे हे भारतातील पहिले पाऊल आहे. गोव्यातील अतिशय सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पामध्ये सुरु करण्यात आलेल्या पेपर मूनला समुद्रकिनाऱ्यावर १६व्या शतकात बांधण्यात आलेल्या किल्ल्याची आणि अरबी समुद्राची साथ लाभल्याने, याठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना व खवय्यांना स्वादाबाबरोबरीनेच डोळे आणि मन तृप्त करणारा अनुभव मिळेल हे नक्की.

आयएचसीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. पुनीत छटवाल यांनी सांगितले, “आपल्या पाहुण्यांना श्रेणीतील सर्वोत्तम डायनिंग अनुभव प्रदान करताना, पाकशास्त्रातील अतिशय अनोख्या संकल्पना आणि वेगवेगळे पदार्थ सादर करण्यात आघाडीवर असण्याची समृद्ध परंपरा देखील आयएचसीएलने जपली आहे. भारतात पेपर मूनची सुरुवात करण्यासाठी रिस्टोरांते पेपर मून एस आर एलसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतातील पहिले लक्झरी बीच रिसॉर्ट ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पासारखे अतिशय नावाजलेले आणि मनोरम्य ठिकाण मिळाल्यामुळे पेपर मूनमधील इटालियन स्वाद आणि आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण असा अनोखा लाभ पाहुण्यांना घेता येईल.”
पेपर मूनचे पहिले रेस्टोरंट मिलानमध्ये १९७७ साली सुरु झाले. आता पेपर मून गोव्याच्या उत्साही आनंदी वातावरणाची पुरेपूर साक्ष देणाऱ्या या ठिकाणी आपले ट्रेडमार्क पारंपरिक इटालियन खाद्यपदार्थ सादर करणार आहे. पेपर मूनमधील पदार्थ सर्वात ताजी सामग्री वापरून तयार केले जात असल्याने दर ऋतूनुसार त्यामध्ये बदल होतात. सामग्रीची निवड अतिशय काळजीपूर्वक केली जात असल्याने पाहुण्यांना दर सीझनमध्ये अनेक वेगवेगळ्या ताज्या पक्वान्नांचा आस्वाद घेता येतो. लोकप्रिय डिशेससोबत स्थानिक सामग्रीपासून बनवलेल्या उच्च प्रतीच्या, खूप वेगवेगळ्या वाईन्स, कॉकटेल्सचा आनंद याठिकाणी घेता येईल. सर्वोत्तम इटालियन कॉफी व पेयांचा लाभ घेता येईल असा कॅफेचा अनुभव देखील याठिकाणी घेता येईल. ताजचा शानदार, सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी व सेवा अनुभव सोबत असल्याने पेपर मूनमध्ये गोव्यात नामांकित ठिकाणी बसून अस्सल इटालियन स्वादांची जादू अनुभवता येईल.

रिस्टोरांते पेपर मून एस आर एलचे क्लॉडिओ बेर्तोनी आणि त्यांच्या टीमने यावेळी सांगितले, “मिलानच्या फॅशन डिस्ट्रिक्टमधून थेट भारतातील सर्वोत्तम बीच डेस्टिनेशनला पोचून पेपर मूनने अस्सल इटालियन स्वाद खिलवण्याच्या गेल्या चार दशकांमधील आपल्या जागतिक कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठला आहे. गोव्यामध्ये ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पा सुरु करून आमचा अनोखा, अभूतपूर्व स्वादानुभव भारतात सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतात आमच्या ब्रँडच्या वाटचालीसाठी आयएचसीएलसोबत भागीदारी करणे ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे.”

अस्सल इटालियन खाद्यपदार्थांविषयीच्या प्रेमापोटी तयार करण्यात आलेले पेपर मून म्हणजे ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अँड स्पामध्ये अस्सल स्वाद आणि शानदार आनंदाचे जणू दुसरे रूप आहे.

अधिक तपशीलवार माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.

About The Indian Hotels Company Limited
The Indian Hotels Company Limited (IHCL) and its subsidiaries bring together a group of brands and businesses that offer a fusion of warm Indian hospitality and world-class service. These include Taj – the iconic brand for the most discerning travellers and ranked as the World’s Strongest Hotel Brand and India’s Strongest Brand as per Brand Finance Hotels 50 Report 2022 and India 100 Report 2022, respectively; SeleQtions, a named collection of hotels; Vivanta, sophisticated upscale hotels; and Ginger, which is revolutionising the lean luxe segment.

Incorporated by the founder of the Tata Group, Jamsetji Tata, the Company opened its first hotel – The Taj Mahal Palace, in Bombay in 1903. IHCL has a portfolio of 247 hotels including 65 under development globally across 4 continents, 11 countries and in over 100 locations. The Indian Hotels Company Limited (IHCL) is India’s largest hospitality company by market capitalization. It is primarily listed on the BSE and NSE.

Please visit: www.ihcltata.com; www.tajhotels.com; www.seleqtionshotels.com; www.vivantahotels.com; www.gingerhotels.com
For more information, please contact: nairita.gh

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें