म्हापसा येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशन

.

 

 

*म्हापसा येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशन*

म्हापसा, ११ नोव्हेंबर – राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री सिद्धपुरुष नारायण देवस्थान सभागृह, काणका, म्हापसा येथे दोनदिवसीय प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनामध्ये १२ नोव्हेंबर या दिवशी ‘मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी कृतीशील असलेल्या ‘गोमंतक मंदिर महासंघा’च्या कार्याची पुढील दिशा ठरवणे’, ‘लव्ह जिहाद’ हे ज्वलंत संकट आणि महिलांचे दायित्व’, ‘अधिवक्त्यांचे राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठीचे योगदान’, महिला संघटना आदी विषयांवर चर्चा होणार आहे. १३ नोव्हेंबर या दिवशी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना आणि हे कार्य करतांना येणारी आव्हाने’, ‘पोर्तुगिजांनी हिंदूंवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी जागृती करणारे ‘गोवा फाईल्स’ प्रदर्शन आणि याविषयी जागृतीची पुढील दिशा’, ‘पोर्तुगिजांनी हिंदूंवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’चा सध्या एकमेव पुरावा असलेल्या जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’चे संवर्धन करणे’, ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या उभारणीसंबंधी हिंदूंच्या मागण्या’, ‘धर्मांतर रोखणे’, ‘हलाल जिहाद’ – भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवीन संकट आणि त्यावरील उपाययोजना’ आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून यांविषयी पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई, ‘गोमंतक परशुराम सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी आदींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन असणार आहे. हे अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी आहे.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य, समन्वयक*
हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : 9326103278 )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar