श्री शांता विद्यालय शिवोलीचा विद्यार्थ्यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यावर दिवाळीच्या सुट्टीत

.
पासै वाताहार
श्री शांता विद्यालय शिवोलीचा विद्यार्थ्यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यावर दिवाळीच्या सुट्टीत
शैक्षणिक सहलीचा निमित्ताने भेट दिली.. शालेय पुस्तकातून रायगड बद्दल ऐकून माहिती होती पण प्रत्यक्षात रायगडला भेट देण्यासाठी मुंलांचा एक चमू व शिक्षक रायगडच्या पायथ्याशी हिरकणी वाडीला मुक्कामाला राहिली व दुसऱ्या दिवशी सकाळी रायगड चढायला सुरुवात केली. रायगडावर पायरा चढताना छत्रपतीचे मावळे चढत असल्याचा भास होत होता कारण सर्व जण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, व हर हर महादेव अशा घोषणा देत चालत होते त्यामुळे दोन हजार पायरा चढून सर्व जण वर कधी पोहोचले समजलेच नाही. सुरू वातीला महादरवाजाचे दर्शन झाले. तेथील तटबंदी कातळेला दगडाची व भक्कम अशी आहे. विद्यार्थ्यांनी हत्ती तलावाला वळसा घालून शिरकाई देवीचे दर्शन घेतले.
गाईड च्या मदतीने सर्व माहिती घेतली नंतर गंगा सागर तलावाच्या शेजारील उंच च उंच मनोराची माहिती घेतली. मेणा दरवाजातून आत जात राणाचे महाल, शिवाजी महाराज चा महाल, स्वयंपाकघर, राजदरबार, नगारखाना , धान्य कोठार, अष्टप्रधान मंडळाचे वाडे, बाजारपेठ, जगदीश्वर व वाडेश्वर मंदिर, समाधी स्थळ, व टकमक टोक अशा ऐतिहासिक महान असलेल्या सर्व गोष्टींची माहिती मिळवली त्यानंतर परतीच्या प्रवासात रोपवे चा अनुभव काही क्षणात पायथ्याशी येऊन पोहोचले.
हि सहल यशस्वी करण्यासाठी शिक्षक नवनाथ सावंत, विश्वास सांगाळे, उमेश महालकर तुकाराम सावंत, कपिल वझे, जगदीश कारापुरकर यांनी प्रयत्न केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar