मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लिव इन’मध्ये रहाणार्या आणि लग्नाविषयी विचारणा केल्यावर मारहाण करत तिची निघृणपणे हत्या करणारा लव्ह–जिहादी आफताब हा क्रूर, नराधम आहे. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या हत्येचा तपास करतांना हत्या करण्याचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. आपल्या मुली–बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. हिंदु पालक आणि हिंदु युवती कधी जाग्या होणार ? आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का ? या घटना पहाता राज्यात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करावा, तसेच या प्रकरणी लव्ह जिहादी आफताबला तत्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे ‘रणरागिणी’च्या डॉ.(सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी म्हटले आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि वरील मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने मुंबईतील दादर (पू) रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. पेंडभाजे बोलत होत्या. या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी ‘अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी या वेळी सांगितले.
एका महिला पत्रकाराला ‘कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’ असे वात्सल्याने बोलणार्या पू. भिडे गुरुजी यांना नोटीस पाठवणार्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांवर काही बोलतील का ? राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे भयावह प्रमाण पहाता यावर काही टिप्पणी करणार कि नाही ? असा आमचा प्रश्न आहे. बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहखात्याने चौकशी करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत, असेही डॉ. पेंडभाजे यांनी या वेळी सांगितले