श्री सरस्वती वाचनालयातर्फे बालदिन साजरा
फोटो कॅप्शन: फाज हाऊसिंग कॉलनीतील श्री सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित बालदिन कार्यक्रमात सहभागी झालेली मुले व पालक
थिवी, ता. १५ (वार्ताहर) :
माडेल थिवी येथील श्री सरस्वती वाचनालय यातर्फे फाज हाऊसिंग कॉलनीच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या बालदिन
कार्यक्रमाला लहानमुलांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला.
बालदिनाच्या निमित्ताने मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळ तसेच काही स्पर्धा घेण्यात आल्या. यात सर्वच मुलांनी उत्स्फुर्तपणे भाग
घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना श्री सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. सुभाष कौठणकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी
वाचनालयाचे सदस्य सुधीर रिवणकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाच्या ग्रंथपाल तेजस्वी कामत, स्वरुपा
सोमण, सुजाता रिवणकर व इतरांनी सहकार्य केले.