_*नगर्से, काणकोण येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जागृती बैठक*_
*हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे ! – श्री. सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती*
काणकोण, १ मे – समांतर अशी हलाल अर्थव्यवस्था निर्माण करून राष्ट्राच्या आंतरिक सुरक्षेला धोका निर्माण केला जात आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून हलाल अर्थव्यवस्था उभी करणे हे एक जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने नगर्से, काणकोण येथे २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी 3.30 वाजता एका हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या प्रसाराच्या अनुषंगाने मोखर्ड, काणकोण येथे आयोजित एका जागृती बैठकीत श्री. सत्यविजय नाईक बोलत होते. बैठकीला पैंगीण पंचायतीचे पंचसदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री सतीष पैंगीणकर, ‘हिंदवी स्वराज्य संघटने’चे दिलकुश शेट, चंदन देवीदास, ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे सतीष भट, हिंदुत्वनिष्ठ अशोक च्यारी, सिद्धार्थ देसाई, पंकज नाईक आदींची उपस्थिती होती.
श्री. सत्यविजय नाईक पुढे म्हणाले,‘‘हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर विविध माध्यमांतून आघात होत आहेत. हे रोखण्यासाठी हिंदूंनी धर्मपालन करण्याबरोबरच हिंदूसंघटनाचा अविष्कार दाखवणे आवश्यक आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने नगर्से, काणकोण येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थिती लावावी.’’ बैठकीचे सूत्रसंचालन श्री. रामानंद प्रभु यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गोविंद लोलयेकर यांनी केले.
आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८