केरी पेडणे येथे आज सूत्रसंचालन कार्यशाळा
राज भाषा संचालनालय, पणजी गोवा, केरी न्यु इंग्लिश हायस्कुल,पेडणे आणि केरी शालेय समूह यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन केरी पेडणे येथे करण्यात आले आहे. केरी न्यु इंग्लिश हायस्कुलच्या सभागृहात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा भरवली जाणार आहे.
कार्यशाळेचे उदघाटन राज भाषा संचनालय, पणजीचे सहाय्यक संचालक अनिल सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केरी हायस्कुल पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गंगाराम मठकर, प्राथमिक विद्यालय पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गिरीश शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेचे पाहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होईल. या सत्रात गोव्यातील नामवंत सुत्रनिवेदक प्रा. गोविंद भगत सूत्रसंचालन कार्यशाळेत विद्यार्थी व शालेय समूहातील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर संध्याकाळच्या सत्रात २.३० ते ४.३० या वेळेत पेडणेतील नामवंत निवेदक परेश नाईक मार्गदर्शन करतील.
कार्यशाळेचा समारोप संध्याकाळी ५ वाजता होणार असून त्याला प्रमुख पाहुणे म्हणून केरी न्यु इंग्लिश हायस्कुलचे व्यवस्थापक तातोबा तळकर उपस्थित असतील.