रणरागिणी’च्या वतीने म्हापसा येथे आंदोलन*_

.

_*‘रणरागिणी’चे प्रसिद्धीपत्रक*_

 

_*‘रणरागिणी’च्या वतीने म्हापसा येथे आंदोलन*_

*नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची मागणी*
म्हापसा, 19 नोव्हेंबर – मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून गोव्यातही अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गोव्यात स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने म्हापसा नगरपालिका बाजार प्रवेशद्वार येथे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.
या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत.

आपला नम्र,
सौ. राजश्री गडेकर
समन्वयक, ‘रणरागिणी’
(संपर्क : 77748 51253)

*आंदोलनामधील वक्त्यांचे नावे* –
१. सौ. शुभा सावंत (सनातन संस्था)
२. सौ. राजश्री गडेकर (रणरागिणी शाखा(
३. सौ. चंद्रिका पाडगावकर (शिक्षिका)
४. सौ. रुपाली गवंडलकर(सामाजिक कार्यकर्त्या)
५.अधिवक्त्या सौ. रोशन सामंत
६. श्री. जयेश थळी(मंदिर महासंघ)

*आंदोलनात सहभागी संघटनांची नावे* –

१. सुराज्य न्यास
२. गोमंतक मंदिर महासंघ
३. राष्ट्रीय मातृशक्ती संघटना
४. सनातन संस्था

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar