हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि डिचोली येथील ग्रामस्थ यांची ‘नवा सोमवार’च्या निमित्ताने श्री शांतादुर्गा मंदिर समितीकडे मागणी*_

.

_*प

 

_*हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि डिचोली येथील ग्रामस्थ यांची ‘नवा सोमवार’च्या निमित्ताने श्री शांतादुर्गा मंदिर समितीकडे मागणी*_
*‘नवा सोमवार’ उत्सवाला देवस्थानच्या आवारात इतर धर्मियांना दुकान थाटण्यास अनुमती देऊ नका !*

डिचोली, २१ नोव्हेंबर – मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी ‘नवा सोमवार’ उत्सवाला देवस्थानच्या आवारात इतर धर्मियांना दुकान थाटण्यास अनुमती देऊ नका, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि डिचोली येथील ग्रामस्थ यांनी केली आहे. गावकरवाडा, डिचोली येथील श्री शांतादुर्गा मंदिर समितीची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. श्री शांतादुर्गा मंदिर समितीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतांना ‘हिंदु राष्ट्र संघटना’, ‘भारत माता की जय’, ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, डिचोली’, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, *ह. भ. प. तुळपुळे* आणि डिचोली येथील ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ग्रामस्थ यांनी निवेदनात म्हटले आहे की, मंदिरातील उत्सव हा भाविकांचा श्रद्धेचा विषय आहे आणि मंदिराच्या आवारात धार्मिक गोष्टींचे पालन होणे आवश्यक आहे. अन्य धर्मीय उत्सवाच्या काळात दुकान मांडलेल्या ठिकाणी मांसाहार करण्याची शक्यता असल्याने परिसराचे पावित्र्य भंग होऊ शकते. ‘थुंकी जिहाद’ अतिशय भयंकर आणि किळसवाणा प्रकार आलेला असून यालाही आळा घालणे आवश्यक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अनुमतीविना खाद्यपदार्थांची दुकाने थाटणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ला आळा घातला पाहिजे.

*‘नवा सोमवार’ उत्सवात ‘गोबी मंच्युरियन स्टॉल्स’ बंद करा ! – ‘शिव सागर’ उत्तर जिल्हा*
२८ नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जाणार्‍या ‘नवा सोमवार’ उत्सवात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अनुज्ञप्तीशिवाय ‘गोबी मंच्युरियन आणि चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स’ घातले जाणार आहेत. या खाद्यपदार्थांमध्ये आरोग्यासाठी घातक रसायनिक पदार्थांचा वापर होत असतो आणि या पदार्थांमध्ये पोषण मूल्ये काहीच नसतात. अशा ‘स्टॉल्स’विषयी लोकांमध्ये चीड आहे. उत्सवात अशा खाद्यपदार्थाचे ‘स्टॉल्स’लावायला देऊ नये, अशी मागणी ‘शिव-सागर’ उत्तर जिल्हा या संघटनेने डिचोली तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, नगरपालिका, तसेच अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे केली आहे. *हीच मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी डिचोली पालिकेच्या नगराध्यक्षांकडे केली आहे.*

आपले विश्वासू,
हिंदुत्वनिष्ठ संघटना, डिचोली
संपर्क क्रमांक –

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar