एअरएशिया इंडियाची शुगरबॉक्ससह ‘जगात पहिल्यांदाच’ विविध वैशिष्ट्यांनी युक्त इन- फ्लाइट अनुभव सुविधा ‘एयरफ्लिक्स’ लाँच करण्यासाठी भागिदारी

.

एअरएशिया इंडियाची शुगरबॉक्ससह ‘जगात पहिल्यांदाच’ विविध वैशिष्ट्यांनी युक्त इन- फ्लाइट अनुभव सुविधा ‘एयरफ्लिक्स’ लाँच करण्यासाठी भागिदारी
क्लाउडची ताकद, आकाशात ३६,००० फूट उंचीवर, प्रवाशांना मिळणार कॉन्टेक्श्चुयअल इन- फ्लाइट अनुभव
राष्ट्रीय, २२ नोव्हेंबर २०२२ – एअरएशिया इंडियाने हायपरलोकल क्लाउड प्लॅटफॉर्म शुगरबॉक्ससह ‘एअरफ्लिक्स’ हा अशाप्रकारचा पहिलाच इन- फ्लाइट अनुभव लाँच करण्यासाठी करार केला आहे. आकाशात डिजिटल अ‍ॅक्सेस मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘एअरफ्लिक्स’ ही नाविन्यपूर्ण सेवा कंपनीच्या सर्व विमानांमध्ये मिळणार आहे. भारतीय आकाशांतही ‘एअरफ्लिक्स’ ६००० तासांचा उच्च दर्जाचा कंटेंट उपलब्ध करून देणार असून त्यात १०००+ आंतरराष्ट्रीय व भारतीय सिनेमे, शॉर्ट मूव्हीज, १५००+ वेब सीरीज एपिसोड्स यांचा समावेश असून प्रवाशांना ओटीटी अ‍ॅप्सवर बफर- मुक्त कंटेंट स्ट्रीम करता येईल.

‘एअरफ्लिक्स’ला शुगरबॉक्सच्या क्लाउड फ्रॅगमेंट या पेटंटेड तंत्रज्ञानाचा पाठिंबा देण्यात आला असून त्याद्वारे प्रवाशांना इंटरनेटसारखाच अनुभव देण्यासाठी डिजिटल अ‍ॅक्सेस दिला जाईल, तो ही इन- फ्लाइट कनेक्टिव्हिटीशिवाय. ‘एअरफ्लिक्स’ एअरएशिया इंडियाचा इन- फ्लाइट अँक्सिलियरी प्लॅटफॉर्मसह जोडला गेला असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक उपकरणावरही मेनू पाहाता येईल आणि ऑर्डर देता येईल. १जीबीपीएसचा वेग आणि ८ टीबीची स्टोअरेज क्षमता यांसह ‘एअरफ्लिक्स’ विविध कस्टमाइज्ड पर्याय देते व त्यात गेम्स, एड- टेक कंटेंट, बातम्या- लेख, संगीत, ई- कॉमर्स आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असेल. प्रवाशांना त्यांचे स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅब्लेट पीसीवर www.airflix.airasia.co.in ला भेट देऊन ‘एअरफ्लिक्स’ ला कनेक्ट करता येईल.
लाँचविषयी एअरएशिया इंडियाचे प्रमुख विपणन अधिकारी सिद्धार्थ बुटालिया म्हणाले, ‘प्रवाशांसाठी ‘एअरफ्लिक्स’ अनुभव सुविधा उपलब्ध करताना आणि शुगरबॉक्ससारख्या प्रवर्तकीय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मशी भागिदारी करून आकर्षक व वैविध्यपूर्ण कंटेंटची श्रेणी उपलब्ध करून देताना व पर्यायाने ग्राहकानुभव उंचावताना आम्हाला आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने इन- फ्लाइट डायनिंग, मनोरंजन आणि खरेदीच्या पलीकडे जात आकर्षक वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक अनुभवाच्या माध्यमातून विमानप्रवासाचा वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
या भागिदारीविषयी शुगरबॉक्सचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित परांजपे म्हणाले, ‘‘एअरफ्लिक्स’सह विमानप्रवासाच्या अनुभवात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यासाठी एअरएशिया इंडियासह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘एअरफ्लिक्स’ हा अशाप्रकारचा पहिलाच जागतिक उपक्रम असून आम्ही शुगरबॉक्सचे क्लाउड फ्रॅगमेंट हे पेटंटेड तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदाच क्लाउडची ताकद विमानांत उपलब्ध करून देत आहोत. यामुळे ‘एअरफ्लिक्स’ला कितीतरी सेवा याक्षेत्रात पहिल्यांदाच मिळवून देता येणार असून त्यात ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस, ईकॉमर्स, बातम्या, पॉडकास्ट आणि इन- फ्लाइट एफ अँड बी ऑर्डरिंगचा समावेश असेल. ग्राहकांना हायपरलोकल पातळीवर मोठ्या प्रमाणावर कंटेंट उपलब्ध करून देण्याच्या संधींचे अवकाश खुले करण्याची ही केवळ सुरुवात आहे. ‘एअरफ्लिक्स’द्वारे मिळणार असलेल्या सुविधा आणि प्रवाशांना हा अनुभव देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’
Experience the #FunOfFlying with ‘AirFlix’, 36,000 feet in the air. For more information on AirFlix, visit airflix.airasia.co.in
About AirAsia India
AirAsia (India) Private Limited is a subsidiary of Air India Limited and a part of the Tata group. AirAsia India commenced operations on 12th June 2014 and flies over 50 direct and 100 connecting routes across India. The airline offers plush leather seats, hot meals and a host of exclusive benefits for NeuPass loyalty members.
AirAsia India has consistently embraced technology to deliver operational efficiency and enhance guest experiences, offering fast bookings, fab value and fantastic deals on its award-winning mobile apps and website airasia.co.in, and delivering seamless support with an advanced AI-powered multilingual chatbot Tia.
For the latest on AirAsia India’s innovations, promotions, activities and contests, check out AirAsia India on Twitter @AirAsiaIndia, Instagram @AirAsiaIndia, Facebook @AirAsiaIndia and LinkedIn @AirAsiaIndia.
About Sugarbox
Sugarbox is bringing the world its first Hyperlocal Cloud platform to support the Internet of the Future – of Connected Devices, Applications, People and Things. We are solving for deficiencies in connectivity (availability, reliability, latency and cost) and context awareness (who, where, what), by getting the Cloud closer to the End user and providing the best-in-class experiences for the Connected, Under-connected & Unconnected.

Co-founded by Rohit Paranjpe, Devang Goradia and Ripunjay Bararia in 2016, Sugarbox is reimagining Digital access. Using its patented technology platform, Sugarbox enables native Apps to function seamlessly, even when data connectivity is intermittent or unconnected. Presently, the Company works with the likes of Chennai and Hyderabad metro, Central Railways (Suburban Mumbai region) and has powered more than 300gram panchayats across Uttarakhand, Maharashtra, Haryana, Uttar Pradesh, Rajasthan, and Himachal Pradesh. Sugarbox is now entering the skies with the AirAsia India partnership. LinkedIn

For media queries, please contact:
Rohit Kumar, Public Relations, AirAsia India (rohitkumarsingh@airasia.co.in)
Pooja Trehan, Communications, Sugarbox (pooja.trehan@sugarboxnetworks.com)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar