रेसिंग इंडियाचे राजीव सेतु यांनी 2022 एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत मिळवले टॉप 10 फिनिश

.

रेसिंग इंडियाचे राजीव सेतु यांनी 2022 एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत मिळवले टॉप 10 फिनिश

तरुण रायडर कविन क्विंतल यांनी थायलंड टॅलेंट कप 2022 च्या अंतिम फेरीत नोंदवले टॉप 7 फिनिश

चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड), २१ नोव्हेंबर २०२२ – आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया या एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमधील (एआरआरसी) एकमेव भारतीय टीमने २०२२ च्या हंगामाची सकारात्मक सांगता केली.

सातत्यपूर्ण कामगिरी आणि देशासाठी मानसन्मान मिळवत भारताचे कुशल रायडर राजीव सेतु यांनी एशिया प्रॉडक्शनमधील एआरआरसीच्या 250cc (AP250cc) क्लासमध्ये अंतिम रेसमध्ये टॉप १० फिनिश मिळवले. ग्रिडवर १८ व्या स्थानावरून सुरुवात करत राजीव पहिल्याच लॅपमध्ये पुढे गेले. वेट रेस आणि काही अपघातांमुळे तयार झालेल्या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेत ते आठव्या लॅपमध्ये १० व्या स्थानावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत १० व्या स्थानावर चेकर्ड लाइन पार केली व ६ पॉइंट्स मिळवले.

दरम्यान आजचा दिवस संघर्षाचा ठरला आणि त्यानंतर सातव्या स्थानावरून सुरुवात करणारे मात्र लॅप २ मध्ये ट्रॅकबाहेर जाणारे सेंथिल कुमार यांनी परत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. निश्चयीपणा दाखवत ते पूर्ण ताकदीनिशी ट्रॅकवर परतले. आंतरराष्ट्रीय रायडर्सना कडवी झुंज देत सेंथिल यांनी १४ व्या स्थानावर आजची रेस पूर्ण केली व २ पॉइंट्स मिळवले.

अखेरच्या फेरीत राजीव सेतु यांनी ३७ पॉइंट्ससह २०२२ चॅम्पियनशीपची सांगता केली आणि टॉप १५ फिनिश मिळवले, तर सेंथिल यांनी १३ पॉइंट्ससह सांगता केली. होंडा रेसिंग इंडियाने एकंदरीत टॉप १० मध्ये २०२२ सीझनची सांगता केली.

रायडर्सच्या कामगिरीविषयी आपले मत व्यक्त करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘रेसिंग होंडाच्या डीएनएमध्ये आहे. आमच्यासाठी मोटरस्पोर्ट्स ही एक संस्कृती आहे, जी आमचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ब्रँडचे धोरण पूर्णत्वाला नेण्यासाठी महत्त्वाची आहे. आज आमच्या भारतीय रायडर्सची विशेषतः तरुणांची कामगिरी पाहून मी भारावून गेलो आहे. कोविड- १९ मुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतरही आमचे रायडर्र आत्मविश्वासपूर्ण होते आणि त्यांनी आव्हानांचा सामना करत संपूर्ण हंगामात अतुलनीय कामगिरी केली. आमच्या रायडर्सचा उत्साह, टीमने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केलेली कामगिरी आम्ही भारतात मोटरस्पोर्ट्सला चालना देण्याच्या बाबतीत तसेच भारतातून भावी आंतरराष्ट्रीय विजेते विकसित करण्याच्या बाबतीत योग्य मार्गावर असल्याचे दर्शवते. सर्व सदस्यांनी दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या सीझनसाठी शुभेच्छा देतो.’

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. प्रभू नागराज म्हणाले, ‘यावर्षी रायडर्सनी केलेल्या कामगिरीवर आम्ही समाधानी आणि आनंदी आहोत. आव्हानात्मक वातावरण असून आमच्या रायडर्सनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि या सीझनमध्ये टीमला चांगले स्थान मिळवून दिले. २०२२ मध्ये केवळ राजीव आणि सेंथिलच नव्हे, तर थायलंड टॅलेंट कपमधील आमच्या तरुण रायडर्सनीही दमदार कामगिरी केली. पहिल्यांदाच आमच्या रायडर्सनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले, तर थाई टॅलेंट कपमध्ये पोडियमही संपादन केले. या सीझनच्या रेसची पूर्ण जोशात सांगता केल्यानंतर आमची टीम नव्या गुणवत्तेसह पुढच्या सीझनमध्ये दाखल होईल.’

होंडा रेसिंग इंडिया रायडर राजीव सेतु म्हणाले,

‘आजच्या अंतिम रेसमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी निश्चय केला होता. वारं आणि पावसाळी हवामानामुळे आमची सर्व समीकरणं बदलली होती, मात्र मी रेसमध्ये स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रित केले. आतापर्यंतचा अनुभव आणि प्रशिक्षणाच्या जोरावर मी सर्व आव्हानांवर मात केली आणि टीमसाठी आवश्यक पॉइंट्स व पोझिशन्स मिळवले. इथली सर्व शिकवण सोबत घेत मी आणखी सराव करण्याचे तसेच टीमला यश मिळवून देण्यासाठी नवे डावपेच आखण्याचे ठरवले आहे.’

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडर सेंथिल कुमार म्हणाले,
‘माझ्यासाठी ही अतिशय थरारक आणि अवघड रेस होती. प्रतिकुल हवामानाने सर्वांच्याच मार्गात अडथळे निर्माण केले. चुका टाळणे आणि टीमसाठी पॉइंट्स मिळवणे एवढेच ध्येय मी ठेवले होते. आजच्या कामगिरीवर मी खूष आहे, कारण सर्व आव्हाने तसेच इतर अनुभवी रायडर्सचा मी कौशल्याने सामना करू शकलो. आम्ही पुढच्या सीझनमध्ये आणखी चांगल्या डावपेचांसह परत येऊ.’

थायलंड टॅलेंट कपमधील (टीटीसी) भारतीय रायडर
आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमचे रायडर कविन क्विंतल यांनी २०२२ थायलंड इंडिया कपमध्ये (आशियाई रायडर्ससाठी होंडाचा विकास उपक्रम) आतापर्यंतचे सर्वोत्तम फिनिश मिळवले. आजच्या रेसमध्ये आठव्या स्थानावरून सुरुवात करत कविन यांनी सातत्य राखले आणि योग्य क्षणाचा लाभ घेत सातव्या स्थानावर (सुरुवातीच्या स्थानापेक्षा एक स्थान पुढे) रेसची सांगता केली. चेन्नईच्या या तरुणाने अंतिम रेसमध्ये १४ पॉइंट्स मिळवले (रेस १ – ५ पॉइंट्स, रेस २ – ९ पॉइंट्स) आणि ४१ पॉइंट्ससह सीझनची सांगता करत थायलंड टॅलेंट कपमध्ये भारतीय रायडर्सची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
कविन यांचे सहकारी मोहसिन पी (२० वर्षीय) यांनीही रेसमध्ये आत्मविश्वासपूर्ण कामगिरी केली. सहाव्या फेरीच्या दुसऱ्या रेसमध्ये १८ रायडर्सच्या ग्रिडवर १६ व्या स्थानावरून सुरुवात करत केरळच्या या तरुणाने तगड्या स्पर्धेला तोंड दिले आणि १३ वे स्थान मिळवले. 28:30.428 ची एकूण वेळ नोंदवत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील केवळ दुसऱ्याच स्पर्धेत ३ पॉइंट्स मिळवले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar