म्हापसा वाताहार
मोरजी येथील पत्रलेखक तथा विचार वैभव चे संपादक तुकाराम शेटगावकर यांचा शिक्षक विकास परीषद गोवा संस्थेच्या वतीने बेळगाव येथे संपन्न झालेल्या २६ व्या राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशनात पत्रकार भुषण हया पुरस्काराने गौरवण्यात आले.
शिक्षक विकास परीषद गोवा या संस्थेचा वतीने बेळगाव गणेशपूर येथील लोकमान्य भवनात २६ वे राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात शैक्षणिक धोरणावर आणि सद्यस्थिती या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी विविध राज्यातील निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवराचा राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपसंचालक अरविंद दिक्षित ( निवृत्त) यांच्या हस्ते डॉ. वामनराव साळवे ( कोल्हापूर) यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, संस्थेचे पुरस्कार गौरव चिन्ह आदी प्रदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रमेश कुलकर्णी, पुष्पा गायतोंडे, मारूती कुंभार, सतीश वेळिप, सुरज नाईक आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एलेन बोजीस यांनी केले.