मणिपाल हाॅस्पिटल्स, गोवा येथे पहिली व्हिडीओ-अॅसिस्टेड थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण*

.

*मणिपाल हाॅस्पिटल्स, गोवा येथे पहिली व्हिडीओ-अॅसिस्टेड थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण*

गोवा, नोव्हेंबर २४, २०२२ः गोवा येथे नावीन्यपूर्ण अशी व्हिडीओ अॅसिस्टेड थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया (व्हीएटीएस) पहिल्यांदाच मणिपाल हाॅस्पिटल्स, गोवा येथे यशस्वीरित्या पार पडली. थोरॅक्समध्ये ६ सेंटीमीटरचा ट्यूमर असल्याचे निदान झालेल्या व १०५ किलो वजन असलेल्या ४९ वर्ष वयाच्या पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

आॅपरेटिंग सर्जन डाॅ. श्रीधरन एम आणि डाॅ. शेखर सालकर तसेच भूलतज्ज्ञ डाॅ योगेश गावडे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले की व्हीएटीएसच्या माध्यमातून तो ट्यूमर पूर्णपणे काढून टाकण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया किमान रक्तस्त्राव व एक तासाच्या आत पूर्ण करण्यात आली.
संबंधित रुग्ण छातीत दुखणे व खोकल्याची लक्षणे सांगत रुग्णालयात दाखल झाला होता. व्हीएटीएस यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर अवघ्या ४ तासात वेदनारहित हालचाल रुग्ण करीत होता. किमान छेद घेऊन केलेली शस्त्रक्रिया पाहून रुग्णालाही मानसिकदृष्टीने बरे वाटत होते. चेस्ट ट्यूब दुसऱ्या दिवशी काढून टाकण्यात आली व रुग्णाला तिसऱ्या दिवशी घरी पाठविण्यात आले.

डाॅ. श्रीधरन एम, आॅपरेटिंग सर्जन, मणिपाल हाॅस्पिटल्स, गोवा म्हणाले, “जलद रिकव्हरी, शस्त्रक्रिया-पश्चात किमान वेदना आणि किमान छेद घेऊन ट्यूमर काढण्यासाठी व्हीएटीएस पद्धत वापरली जाते. अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही निवडक फुफ्फुसाचे कर्करोग, अन्ननलिकेचे कर्करोग, फुफ्फुसातील मेटास्टॅटेक्टोमी आणि निदानात्मक टिश्यू बायोप्सी यामध्ये उपयुक्त de ठरते. या पद्धतीमुळे रुग्णसेवेत अमुलाग्र बदल झाले आहेत.”

व्हीएटीएस ही किमान छेद घेत करण्यात येणारी श्स्त्रक्रिया आहे. त्याला व्हिडीओ अॅसिस्टेड थोरॅकोस्कोपिक सर्जरी असे म्हणतात. रुग्णाच्या छातीमध्ये असलेल्या आजार, दुखण्याची कारणमिमांसा करण्यासाठी व्हीएटीएस पद्धतीचा अवलंब केला जातो.

व्हीएटीएस शस्त्रक्रियेदरम्यान एक छोटा कॅमेरा (थोरॅकोस्कोप) आणि सर्जिकल टूल्स रुग्णाच्या छातीमध्ये एक किंवा अधिक छेद घेऊन आत ठेवले जातात. पारंपरिक पद्धतीने अशी शस्त्रक्रिया केल्यास १५ ते २० सेंटीमीटर एवढा मोठा छेद छातीमध्ये शोल्डर-ब्लेड खाली घ्यावा लागतो. यामध्ये बरगड्यांना व स्नायूला दुखापत होण्याची शक्यता असते व त्यामुळे शस्त्रक्रियेपश्चात रुग्णाला प्रचंड वेदना होतात. व्हीएटीएसमध्ये मात्र अत्यंत कमी आकाराचा छेद घेतला जातो व शस्त्रक्रिया-पश्चात कमी वेदना होतात. तसेच किमान वेदनाशामक औषधे, किमान रक्तस्त्राव, रुग्णालयातून लवकरात लवकर घरी जाता येणे व आपल्या दैनंदिन कामास सुरवात करणे हे या पद्धतीचे फायदे आहेत.

डाॅ. शेखर सालकर, आॅपरेटिंग सर्जन, मणिपाल हाॅस्पिटल्स, गोवा म्हणाले, “कोलाॅन व रेक्टम कॅन्सरवर पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या शस्त्रक्रियांबरोबरच या नव्या पद्धतीचा वापर आता आमच्या हाॅस्पिटलमध्ये होत आहे. रुग्णांसाठी असलेल्या सर्वंकष कॅन्सर केअरचा एक महत्त्वाचा भाग म्हणून व्हीएटीएस शस्त्रक्रियेचा पर्याय आम्ही रुग्णांना देणार आहोत.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें