पासै वाताहार
ज्ञानदीप प्रतिष्ठान गोवातफै जेष्ठ नागरिकांसाठी काशी, अयोध्या तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली. काशी विश्वनाथ धाम, चित्रकूट, प्रयाग व अयोध्या तीर्थयात्रेस गोव्यातील विविध भागातून आलेल्या एकूण ४५ तीर्थयात्रेनी भाग घेतला.
वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर दर्शन, गंगा आरती व गंगा नदी च्या किनारी वसलेल्या विविध घाटाचे दर्शन व घाटांची माहिती तीर्थयात्रेनी देण्यात आली. सारनाथ येथील बौद्ध मंदिर व परिसरात भेट देऊन यात्रा चित्रकूट येथे मार्गस्थ झाली. चित्रकूट येथे हनुमान धारा, सती अनूसुया मंदिर इत्यादी स्थानाचे दर्शन घेऊन संध्याकाळी मंदाकिनी तसेच किनाऱ्यावर श्री प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्षमण यांच्या वनवास काळातील वास्तव्याने पावन झालेल्या विविध स्थळाचे दर्शन व आरती झाल्यावर दुसऱ्या दिवशी च्या प्रयाग येथील प्रवासासाठी रवाना झाले. प्रयाग येथे गंगा, यमुना व सरस्वती नदी च्या पवित्र अशा त्रिवेणी संगमावर यात्रेकरूनी पुजा केली. घाटावरून छोट्या नावेतून संगमावर जाण्याचा एक वेगळा अनुभव सर्व तीर्थयात्रेनी घेतला
. प्रयाग ते अयोध्या दरम्यान प्रवासात मनगढ येथील प. पु. श्री कृपाळू महाराजांच्या भक्ती धाम परीसराला भेट देण्याची संधी सर्वना मिळाली. श्रीकृष्ण लीलांचे विविध देखावे अप्रतिम कलाकुसरीने संगमरवर मंदिर, सुंदर फुलझाडांनी नटलेला संपूर्ण परीसर सजीव वाटणारा मूर्ती हे सर्व मंत्रमुग्ध करणारे होते. संस्थेचे मार्गदर्शक प. पू. मुकुंद महाराज यांच्या आशीर्वाद ने व तिथाटन विभागाच्या राखी पालेकर यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदीप प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था गेली काही बर्ष जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रेचे आयोजन करते. फोटो तिर्थयित्रेस सहभागी तिर्थयात्री