राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकेल ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री करू नका ! – हलाल सक्तीविरोधी कृती समितीची फोंडा येथे ‘गोवा बागायतदार’ संस्थेकडे मागणी*

.

 

 

*राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकेल ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री करू नका ! – हलाल सक्तीविरोधी कृती समितीची फोंडा येथे ‘गोवा बागायतदार’ संस्थेकडे मागणी*

फोंडा, २६ नोव्हेंबर – राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकेल अशा ‘हलाल’ अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणार्‍या ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन हलाल सक्ती विरोधी कृती समितीने ‘गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री सोसायटी’च्या फोंडा येथील मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्थापन झालेल्या हलाल सक्ती विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने २६ नोव्हेंबर या दिवशी विविध आस्थापनांच्या व्यवस्थापनांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली. या शिष्टमंडळामध्ये ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’चे निमंत्रक श्री. सत्यविजय नाईक, श्री. धाकू कुट्टीकर, श्री. सुनिल सिंग,श्री. उत्तम कुमार, श्री. बलराम, श्री. अशोक कुमार, श्री. जयंत जगताप आदींचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतात हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही एक मुख्य संघटना आहे. या संघटनेने ७/११ चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, २६/११ चे मुंबईवरील आक्रमण, मुंबईतील झवेरी बाजारातील साखळी बॉम्बस्फोट, आदी अनेक आतंकवादी घटनांतील मुसलमान आरोपींसाठी कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले आहे. अशा एकूण ७०० जणांचे खटले जमियत ही संघटना लढवत आहे. यासाठीचा लागणारा निधी हलाल प्रमाणपत्रांद्वारे हिंदूच त्यांना मिळवून देत आहेत. याचा अर्थ हलाल निधीचा वापर आतंकवादाच्या आरोपींना साहाय्य करण्यासाठी होत आहे, हे स्पष्ट आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीने गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणार्‍या संस्था अथवा दुकाने यांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री करू नये.

आपला विश्वासू,
*श्री. सत्यविजय नाईक*
हलाल सक्तीविरोधी कृती समिती
संपर्क क्रमांक – 9158954455

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें