अस्नोडा वाताहार
इंडियन रेड क्रॉस सोसायटी कडून स्टिल भांडी वितरित

अस्नोडा वाताहार
कामुली॑ बादैश येथील १५ गरजू कुटुंब प्रमुखांन इंडियन रेड क्रॉस सोसायटी बादैश शाखेकडून स्टिल च्या भांडयाचे संच वितरित करण्यात आले.
कामुली॑ पंचायतीच्या सहकार्याने संच वितरणाचा कार्यक्रम कामुली॑ पंचायतीच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बादैश शाखेचे अध्यक्ष प्रा. सुभाष कौठणकर, सलीम इसानी,डॉ.नुतन बिचोलकर सरपंच छाया गाड, उपसरपंच संजना माशेलकर, पंच सदस्य रंजना नाईक, पांडुरंग खोजुवेकर, स्वंयपुर्ण मित्र प्राजक्ता गोलतेकर, उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्रा. सुभाष कौठणकर यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. डॉ. नुतन बिचोलकर यांनी चांगल्या आरोग्यासाठी ध्यायची काळजी तसेच रेड क्रॉस सोसायटीमाफत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.स्वागत व पाहुण्यांची ओळख माजी सरपंच शरद गाड यांनी करून दिली. सरपंच छाया गाड यांनी आभार मानले. सुत्रसंचालन शरद गाड यांनी केले.