एअरबीएनबीतर्फे गोवा पर्यटन विभागाच्या साथीने सादर आहे ‘रिडिस्कव्हर गोवा’*

.

*एअरबीएनबीतर्फे गोवा पर्यटन विभागाच्या साथीने सादर आहे ‘रिडिस्कव्हर गोवा’*

*एअरबीएनबीवर गोव्यातील स्थानिक अनुभवांचा आठवडाभराचा सोहळा, आयोजनात तज्ज्ञांचा सहभाग*

२९ नोव्हेंबर २०२२: एअरबीएनबी सादर करत आहेत ‘रिडिस्कव्हर गोवा’… गोवा पर्यटन विभागासोबतचा, समुद्रकिनारे आणि झगमगत्या नाईटलाइफपलिकडील, खास गोव्याच्या विस्तृत सांस्कृतिक बहूविधतेचा आठवडाभराचा सोहळा. गोव्यातील अस्सल गोष्टींचा मूर्त आणि सुंदर अनुभव मिळावा यासाठी कल्चर (Cultre) या सर्जनशील आणि सांस्कृतिक संस्थेला या कार्यक्रमात नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे. कल्चरतर्फे कंटेंट, उत्पादने आणि विविध अनुभवांच्या माध्यमातून भारतातील बहूविध सांस्कृतिक वारशाला लोकांपुढे आणले जाते.

‘रिडिस्कव्हर गोवा’ हा सोहळा १२ ते १८ डिसेंबर या काळात रंगणार आहे. वेचक अनोखी संस्कृती, संपन्न वारसा, सांगीतिक परंपरा, खाद्यपदार्थ आणि गोव्यातील उत्तर आणि दक्षिणेकडील अप्रतिम निसर्गसौंदर्य अशा बाबींवर भर देत स्थानिक तज्ज्ञांच्या आयोजनानुसार या सोहळ्यात १० हून अधिक खास एअरबीएनबी एक्स्पिरिअन्सेस असतील.

अनेक वर्षांपासून गोव्यातील अनोखे जनजीवन आणि जीवनशैलीच्या रुपात गोव्याने आपला पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा आजही जपला आहे. गोवा आणि तेथील संस्कृतीच्या या आठवडाभराच्या सोहळ्यातून याच बाबींवर भर दिला जाणार आहे. गोव्यातील अनेक गोष्टींमध्ये, अनुभवांमध्ये रममाण होण्याची संधी या सोहळ्यातून मिळेलच शिवाय तेथील स्थानिक उत्साही संस्कृतीचा भाग होऊन ती अनुभवण्यातही साह्य मिळेल. गोव्याला एक अनोखे राज्य बनवणाऱ्या अनेक बाबी आजही फारशा प्रसिद्ध नाहीत. मात्र, हे सर्व काही उत्साही पर्यटकांना इथे अनुभवता येईल.

गोव्याला आपले मूळ समजणाऱ्या आणि गोव्यातील मूळ उत्साह, चैतन्य जगासमोर आणण्याचे ध्येय बाळगणाऱ्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांतर्फे या सोहळ्यात खास आणि अनोखे अनुभव देऊ केले जाणार आहेत. एक स्थानिक म्हणून गोव्यातील अस्सल अनुभव घेण्यास प्रवाशांना प्रोत्साहन देणाऱ्या, समुदायांवर आधारित पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमामागील एअरबीएनबीचा मूळ उद्देश आहे.

एअरबीएनबी इंडिया, साऊथईस्ट एशिया, हाँगकाँग आणि तैवानचे व्यवस्थापकीय संचालक अमनप्रीत बजाज म्हणाले, “गोवा हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि एअरबीएनबीसाठी ते एक महत्त्वाचे स्थळ आहे. गोव्यातील समुदायांशी सखोल जोडलेले भागीदार म्हणून आम्ही राज्यात अनोखे आणि नितांतसुंदर अनुभव अधिक व्यापक करण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपण कशा प्रकारे प्रवास करतो याबाबतीत पर्यटक अधिकाधिक सजग होत आहेत शिवाय स्थानिक समुदायांवर सकारात्मक परिणाम साधण्यासाठी आपला सहभाग असण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. रिडिस्कव्हर गोवाच्या माध्यमातून असे अनुभव देऊ करणे आणि खऱ्या अर्थाने गोव्यातील मूळ संस्कृतीचा आस्वाद घेता येईल यासाठी पर्यटकांना साह्य करणे हा आमचा उद्देश आहे. सुक्ष्म उद्योगांना साह्य करत प्रवाशांना गोव्याचा आनंद, अनुभव घेता यावा यासाठी स्थानिक सरकारच्या जोडीने काम करण्यास आम्ही बांधिल आहोत.”

रिडिस्कव्हर गोवा उपक्रमाबद्दल गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन खुंटे म्हणाले, “गोवा म्हणजे अनेक सुंदर गोष्टींचा खजिना आहे आणि म्हणूनच राज्यातील या विविध सुंदर भागांचा आस्वाद जगभरातील पर्यटकांना घेता यावा यासाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेत असतो. एअरबीएनबीसोबतच्या या भागीदारीमुळे राज्यातील किनारे वगळता इतर भागातील पर्यटन आणि होमस्टे पर्यटनाला चालना मिळेल. होमस्टे व्यवसायात स्थानिक स्त्रियांचा वाटा महत्त्वाचा आहे. अशा उपक्रमांमुळे या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि दुर्गम भागातील समुदायांनाही लाभ मिळतील. राज्यातील किनारी भाग वगळता इतर भागातील पर्यटन आणि होमस्टेला चालना देण्यासाठी एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

‘रिडिस्कव्हर गोवा’ उपक्रमाचा भाग म्हणून पर्यटकांना एडिबल आर्काइव्हसच्या शेफ अनुमित्रा यांच्यासोबत अस्सल फाइव्ह-कोर्स मील च्या माध्यमातून गोव्याच्या अनोख्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. तसेच शतकानुशतके जपल्या गेलेल्या इंडो-पोर्तुगीज संस्कृतीचा संपन्न अनुभव मिळवण्यासाठी पोर्तुगाल आणि गोव्यातील दोन ख्यातनाम संगीत शैलींचा आस्वाद

घेत मडगाव येथे फादिस्ता सोनिया शिरसाट यांच्यासह फॅडो आणि मँडो यांच्यासोबत संध्याकाळ रम्य बनवता येईल. तुम्हाला बाहेर फिरणे आवडत असेल तर नदीकिनारी ई-सायकलिंग टूर करा, साल बॅकवॉटर्समध्ये कायकिंगला जा किंवा कोस्ट ट्रेलसाठी उंच कड्यावर जा.

इतर एअरबीएनबी अनुभव:

-गोवा ब्रूइंग कंपनीसोबत ब्रूवरी टूर आणि टेस्टिंग
-गोव्यातील वाड्यांचा फेरफटका
-सूर्यास्त आणि चांदण्या रात्रीची सफर
-गार्डियन स्पिरिट्स ऑफ गोवा – संवाद साधणारी फिल्म
-पॉटरी क्लासमध्ये आमच्यासोबत मातीची कलाकुसर शिका
-शेफ अविनाश मार्टिन्स यांच्यासोबत खास फार्म-टू-टेबल अनुभव
-मारिओ मिरांडा आणि गोवा- अ स्केचवॉक

‘रिडिस्कव्हर गोवा’ अनुभवांची संपूर्ण माहिती मिळवा periences on airbnb.com/rediscovergoa इथे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar