हेल्थतर्फे नवीन स्टार आऊट पेशंट केअर विमा योजना सादर

.

हेल्थतर्फे नवीन स्टार आऊट पेशंट केअर विमा योजना सादर

भारत, २९ नोव्हेंबर २०२२: भारतातील पहिली स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने अलिकडेच नवीन स्टार आऊट पेशंट केअर विमा योजना सादर केली. या विमा योजनेचा उद्देश ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत संपूर्णपणे डिजिटल दाव्यांच्या प्रक्रियेसह संपूर्ण आरोग्य आणि निरोगीपणाचा लाभ पुरविणे हा आहे.

आज भारतात सर्व आरोग्य सेवा खर्चापैकी ६०% पेक्षा जास्त खर्च बाह्यरुग्ण विभागाच्या खर्चाशी संबंधित आहेत ज्यात डॉक्टर सल्ला शुल्क, औषधांची बिले आणि प्रयोगशाळेच्या चाचण्यांचा समावेश आहे. परंतु बहुतेक आरोग्य विमा उत्पादने केवळ रूग्णालयात भरती केल्यानंतर होणाऱ्या खर्चालाच संरक्षण देतात. ग्राहक आणि त्याचे कुटुंब यांना त्यांच्या दैनंदिन आरोग्य सेवा खर्चासाठी संरक्षण मिळत नाही. आरोग्य विमा संरक्षणातील ही दरी भरून काढण्यासाठी स्टार आउट पेशंट केअर इन्शुरन्स पॉलिसी सुरू करण्यात आली.

स्टार आऊट पेशंट केअर इन्शुरन्स पॉलिसी हे संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर्स, क्लिनिक्स आणि निदान केंद्रांमध्ये प्रवेश मिळवून देत ग्राहकांच्या सर्वांगीण आरोग्य कल्याणाचे उद्दिष्ट ठेवणारे एक स्वतंत्र आरोग्य संरक्षण आहे. एकदा खरेदी केल्यावर ग्राहक कॅशलेस आधारावर विम्याच्या रकमेपर्यंत कोणत्याही नेटवर्क सुविधेमध्ये अमर्यादित व्हर्च्युअल टेलि-सल्ला सेवा, रुग्णालयातील अमर्यादित सल्ला सेवा, फार्मसी खर्च आणि निदान चाचण्या घेऊ शकतात.

ग्राहक वैयक्तिक किंवा फ्लोटर आधारावर विमा योजना खरेदी करू शकतात आणि कुटुंबातील ६ सदस्यांना वैद्यकीय संरक्षण पुरवू शकतात. प्रौढांसाठी विमा योजना घेण्यासाठीचे किमान वय १८ वर्षे ते ५० वर्षे आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी ३१ दिवस ते २५ वर्षे आहे.

विमा योजनेबाबत बोलताना स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. विकास शर्मा म्हणाले, “वैद्यकीय महागाईमुळे सर्व उपचारांच्या खर्चात वाढ झाली आहे. आज, बाह्यरुग्ण सेवा जसे की सल्ला शुल्क, औषध बिले आणि निदान चाचण्या यांचा खर्च मोठा आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये हे टाळता न येणारे अत्यावश्यक उपचार आहेत. कालांतराने, यामुळे लोकांवर मोठ्या खर्चाचा भार पडतो. स्टार आउट पेशंट केअर विमा योजनेचा उद्देश बाह्यरुग्ण खर्चासाठी अत्यंत आवश्यक आरोग्य संरक्षण कवच पुरवून समाजातील प्रत्येक घटकाला सेवा प्रदान करण्याचे आहे.”

ग्राहक १ वर्षाच्या विमा योजना मुदतीसाठी रु. २५,०००/-, रु.५०,०००/-, रु.७५,०००/- आणि रु.१,००,०००/- चे संरक्षण सादर करणार्‍या कोणत्याही विमा रकमेचा (SI) पर्याय निवडू शकतात.

या पॉलिसीमध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्व्हर प्लॅनमध्ये अनुक्रमे १,२ आणि ४ वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांच्या उपचारावर संरक्षण मिळते.

नूतनीकरणाच्या वेळी ग्राहक दोन सलग क्लेम फ्री वर्षांच्या प्रत्येक ब्लॉकनंतर प्रीमियमवर २५% सवलतीसाठी पात्र ठरतात.

योजना पर्याय आणि पॉलिसी तपशीलांसह स्टार आउट पेशंट केअर विमा पॉलिसीबद्दल अधिक माहितीसाठी www.starhealth.in/star-outpatient-care-insurance-policy ला भेट द्या

About Star Health Insurance:
Star Health and Allied Insurance Co Ltd (BSE:543412 | NSE:STARHEALTH) commenced its operations in 2006 as India’s first Standalone Health Insurance Company with business interests in Health, Personal Accident and Overseas Travel Insurance. The company uses its vast resources to focus on service excellence and product innovation to deliver the best to its customers. Star Health has been providing innovative health insurance products to individuals, families and corporates, directly and through various channels – agents, brokers, online and digital channels like web aggregators, fintech, etc. Star Health is also a prominent Bancassurance player with long standing relationship with multiple leading banks and NBFCs.

Star Health currently has 14000+ employees with 807 branch offices spread across 26 states and 4 union territories in India. These existing branches are also supplemented by an extensive network of over 355 Sales Managers Stations (“SMS”), which are small individual service centers, located across India. In FY 2022, Star Health had a gross written premium of Rs. 11,463 crore and a net worth of Rs. 4,513 crore.

Star Health and Allied Insurance Company Limited is listed on both the National Stock Exchange (NSE) and the Bombay Stock Exchange (BSE)

For more information, please visit www.starhealth.in

Star Health and Allied Insurance
Paul Ebenezer
Email ID: paul.ebenezer@starhealth.in
Mobile No: 7397398709
Adfactors PR
Veena Krishnan
Email ID:veena.krishnan@adfactorspr.com
Mobile No: 9930309052

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar