*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याची स्वच्छता*
फोंडा, ३० नोव्हेंबर – शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने ३० नोव्हेंबर या दिवशी फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज किल्ला येथे ‘गड स्वच्छता’ उपक्रम राबवला. किल्ल्याची ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामध्ये ‘हिंदू वाहिनी’चे सर्वश्री राजीव झा, ‘जनशक्ती वेलफेर असोसिएशन’चे धाकू कुर्टीकर, प्रवीण जाधव, सुरेश शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अर्जून खरात आदींनी सहभाग घेतला.
आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समितीकरिता
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)