केरीत गीता जयंतीनिमित्त ४० भागवदगीता ग्रंथांचे विद्यार्थाना वितरण

.

केरीत गीता जयंतीनिमित्त ४० भागवदगीता ग्रंथांचे विद्यार्थाना वितरण

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये आज गीता जयंतीनिमित्त ४० भागवदगीता ग्रंथांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष गणू नारायण वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा गीता ग्रंथ वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी मोरजी पेडणे इस्कॉन मंदिराचे आध्यात्मिक मार्गदर्शक दयानिधी गौरंग दास कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या हस्ते इयत्ता १० तील सर्व विद्यार्थी आणि इयत्ता पहिली ते नववी इयत्तेत मागील शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक पटकावल्या विद्यार्थ्याना हा ग्रंथ प्रदान करण्यात आला.

सुरुवातीला दयानिधी दास यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भागवदगीतेचे पूजन झाले. गौरी मराठे, सिद्धी दाभोळकर, सायली साटले आणि तनिष्का साळगावकर यांनी कर्मांयेवाधिकारस्ते मा फलेशु श्लोकाने सर्वांचे स्वागत केले. नियती मठकर यांनी गीतेचा भावार्थ विशद केला.

याप्रसंगी बोलताना दयानिधी गौरंग दास म्हणाले की,
भगवदगीता हे भगवंताचे गीत आहे. शक्ती, प्रसिद्धी, श्रीमंती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या सहा ऐश्वर्यानी युक्त ही गीता आहे. ती भगवंताने निर्मिलेली असल्याने ती
ती दोषमुक्त आणि परिपुर्ण आहे. कुरुक्षेत्रावरील धर्मयुध्दावेळी संभ्रमावस्थित अर्जुनाला याच भागवदगीतेने सावरले. मनावर नियंत्रण, विचार स्थैर्य, आणि चंचल, अस्वस्थतेच्या जाळ्यातून बाहेर पडायचे सामर्थ्य भागवदगीतेत आहे. म्हणून अर्जुनाने जसे श्रीकृष्णाला आपले मार्गदर्शक म्हणून निवडले तसे आजच्या विद्यार्थ्यानी आपले चांगले मार्गदर्शक निवडून जीवन यशस्वी करावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी सावंत हिने केले. मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी शेवटी आभार मानले. तर शिक्षक गुरुप्रसाद तांडेल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले.

फोटो
केरी पेडणे येथे गीता जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना इस्कॉनचे आध्यात्मिक मार्गदर्शक दयानिधी गौरंग दास. सोबत मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, सलोनी हर्जी, निषिता आकरकर व सत्यवान हर्जी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar