हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाची एड्स दिनानिमित्त रॅली

.

हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाची एड्स दिनानिमित्त रॅली.
हरमल येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय व व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या रेड रेबन क्लब ने राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स विषयासंबंधी समाजात जागृती व्हावी या हेतूने एका रॅलीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी एड्स संबंधी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर हिरवा बावटा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. रेड रिबन क्लबचे संयोजक शशीधर हळर्णकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी धर्मा वस्त व शिक्षिका कुमारी निकिता कोरखणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीत सामील झालेल्या विद्यार्थ्यांनी एड्स संबंधी माहिती व त्याविषयीची खबरदारी देणारे तक्ते दर्शवत घोषणाही दिल्या. विद्यालय आवारात सुरू झालेल्या या रॅलीची हरमल तिठा व पार्सेकर सॉ मिल या मार्गाने फिरून परत विद्यालय आवारात आल्यावर सांगता झाली.सुरवातीला प्राचार्याची मार्गदर्शन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar