वाताहार
जायंट्स गृप ऑफ थिवी तफै गणेशपुरी म्हापसा येथील श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल च्या शिशूवाटिका विभागाला शैक्षणिक साधने विकत घेण्यासाठी धनादेश
हायस्कूल चे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. जायंट्स गृप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर यांनी हा धनादेश मुख्याध्यापक रूपेश सावंत यांच्या कडे सुपूर्द केला. श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हापसा नगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर उपस्थित होत्या.

यावेळी व्यासपिठावर जायंट्स गृप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर, मुख्याध्यापक रुपेश सावंत, जायट्फेडरेशन इंटरनॅशनल १० चे अध्यक्ष बसवराज पुजारी, माजी अध्यक्ष गणपत रायकर, दिलीप महाले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. नुतन बिचोलकर यांनी सांगितले की जायंट गृप ऑफ थिवी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. जायंट्स गृप ऑफ थिवी कडून आपण अनेक गोष्टी शिकलो. समाजासाठी जायंट्स गृप थिवी अनेक प्रकारचे प्रकल्प राबवितात त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.
सुरूवातीला मुख्याध्यापक रूपेश सावंत यांनी स्वागत व ओळख करून दिली. जायंट्स फेडरेशन इंटरनॅशनल १० चे अध्यक्ष बसवराज पुजारी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्ण कामत यांनी केले
धनादेश देताना निलेश होडारकर, बाजूला डॉ. नुतन बिचोलकर, बसवराज पुजारी, मुख्याध्यापक रूपेश सावंत