न्यु इंग्लिश हायस्कूल कैरीचे
प्रत्युष हर्जी, वेदांत तळकर , रोहित तळकर जिल्हास्तरीय एथलेटिक स्पर्धेसाठी पात्र
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी प्रत्युष हर्जी यांनी पेडणे तालुका स्तरीय एथलेटिक स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम येण्याचा मान पटकवला. तर १७ वर्षांखालील गटात वेदांत तळकर यांनी ४०० मीटर शर्यत आणि रोहित तळकर यांनी ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत तालुका पातळीवर द्वितीय पारितोषिक पटकावले.
गोवा राज्य क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे तालुका स्थरिय मिनी आणि सेकेंडरी पातळीवरील क्रीडा स्पर्धा दि ७ आणि ८ रोजी पेडे क्रीडा संकुल, म्हापसा येथे संपन्न झाली.
त्यात केरी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मुलांनी आपली चमक दाखवत जिल्हा स्तरीय एथलेटिक स्पर्धेत धडक मारली आहे. आगामी स्पर्धा जानेवारी महिन्यात होत असून त्यात प्रत्युष हर्जी, वेदांत तळकर आणि रोहित तळकर हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शारीरिक शिक्षक आल्फ्रेड रोद्रिगीज रोड्रिगीज यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष नारायण केरकर, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर , शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
फोटो
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलच्या यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, रोद्रिगीज रोड्रिगीज, ज्येष्ठ शिक्षिका निषिता आकरकर, सत्यवान हर्जी.