*हिंदू रक्षा महाआघाडीच्या महिला एकत्रीकरण कार्यक्रमात हिंदु धर्मावरील आघातांविषयी प्रबोधन*
पणजी, १३ डिसेंबर – हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने करमळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तिसवाडी तालुका महिला संघटन मेळाव्यात ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘धर्मांतर’ आदी हिंदु धर्मावरील आघात आणि त्यांवरील उपाययोजना यांविषयी प्रबोधन करण्यात आले. मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी मार्गदर्शन केले.
‘लव्ह जिहाद’ची वाढती भीषणता आणि त्यासाठी समाजात शौर्य जागवण्याची आवश्यकता’ या विषयावर मागर्शन करताना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर म्हणाल्या,‘‘लव्ह जिहाद’च्या या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘रणरागिणी’ या महिला शाखेची स्थापना केली आहे. या शाखेच्या माध्यमातून युवतींना धर्मांधांच्या कारस्थानांची माहिती देण्यासह त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात आहे.’’ सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन करतांना धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद होणे आवश्यक असल्याचे म्हटले. तसेच हिंदूंनी ‘हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही सौ. शुभा सावंत यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. श्रेया नाईक यांनी सांघिक गीत गाईले. कार्यक्रमात प्रास्ताविक श्री. सुरेश डिचोलकर, सूत्रसंचालन सौ. सोनाली सावंत आणि आभार प्रदर्शन सौ. दीपाली बाणस्तारकर यांनी केले.
आपला विश्वासू,
हिंदू रक्षा महाआघाडी
९४२३३०७२७८