*पुन्हा एकदा ‘अॅम्प्लिफाइड’: नवीन BMW M340i x ड्राइव्हचे भारतामध्ये पदार्पण.*
BMW इंडियाने आज देशामध्ये नवीन ड्राइव्ह लाँच केली आहे. BMW ग्रुप प्लांट, चेन्नई येथे स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेली कार BMW डीलरशिप नेटवर्कमध्ये आणि Shop.bmw.in च्या माध्यमातून बुकिंग्जसाठी उपलब्ध आहे. डिलिव्हरींना जानेवारी 2023 पासून सुरूवात होईल.
2021 मध्ये विशेषत: भारतीय बाजारपेठेसाठी लाँच करण्यात आलेली BMW M 340i भारतात निर्माण करण्यात आलेली M इंजिनने युक्त पहिली हाय-परफॉर्मन्स BMW आहे. मॉडेल तिची लक्षवेधक कार्यक्षमता, आकर्षक डिझाइन, संपन्न फिचर यादी आणि तिच्यामध्ये असलेल्या अद्वितीय M ड्रायव्हिंग एक्स्पेरिअन्समुळे विभागातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
BMW M 340i मध्ये ‘अल्टिमेट ड्रायव्हिंग मशिन’ – BMW 3 सिरीज आणि M च्या शक्तीचे परिपूर्ण मिश्रण आहे. BMW M ने निर्माण केलेली ही कार 3 चे विलक्षण स्पोर्टिंग तत्व देते, तसेच मोटरस्पोर्टसाठी BMW M ची खरी आवड सामावलेली आहे. हे सर्वोत्तम संयोजन ड्रायव्हर्ससाठी अल्टिमेट अॅड्रेनालाइन रश आहे.