पणजीत १७ रोजी प्राणी मुक्ती रॅलीचे आयोजन

.

पणजीत १७ रोजी प्राणी मुक्ती रॅलीचे आयोजन

पणजी ः ‘दी वीगोवन’ या प्राण्यांना जाचातून बाहेर काढण्यासाठी तळागाळापासून काम करणार्‍या गोवास्थित संस्थेने शनिवार १७ डिसेंबर रोजी ‘गोवा प्राणी मुक्ती रॅलीचे आयोजन केले आहे.
लोकांकडून आपल्या इच्छा प्राण्यांवर लादून खाणे, कपडे, मनोरंजन, प्रयोग करण्यासाठी त्यांचा वापर करणे बंद करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीनी ही रॅली असेल.
देशातील विविध राज्यांतून तसेच गोव्यातूव कार्यकर्ते यासाठी रस्त्यावर उतरणार असून घोषणांद्वारे जगातील सर्वांत अधिक प्रमाणात अन्याय होणार्‍या प्राण्यांच्या प्रश्‍नांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.
कार्यकर्ते दुपारी ४.०० वाजता पाटो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ जमणार असून आझाद मैदानावर या रॅलीची सांगता होणार आहे.
’प्रजातीवाद’ अधोरेखित करण्यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी सार्वजनिक भाषण केले जाईल, ‘प्रजातीवाद’ हा भेदभावाचा एक प्रकार आहे जो त्यांच्या प्रजातींच्या नैतिकदृष्ट्‌या असंबद्ध आधारावर संवेदनशील प्राण्यांच्या शोषणाला चालना देतो.
अन्न, वस्त्र, प्रयोग, करमणूक किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी प्राण्यांचे शोषण करण्यापासून व्यावहारिकदृष्ट्‌या शक्य तितके परावृत्त करणे म्हणजे शाकाहाराचा अवलंब असणे. प्राण्यांचा त्रास टाळण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्याव्यतिरिक्त, पर्यावरणीय विध्वंस आणि जागतिक भूक कमी करण्यासाठी प्राणी-आधारित आहार व इतर गोष्टी टाळणे देखील महत्त्वपूर्ण आहे. दरवर्षी प्रचंड प्रमाणात धान्य, पाणी आणि इतर संसाधनांचा प्रचंड वापर करून आपण ज्या कोट्यवधी प्राण्यांची पैदास करतो. हा विध्वंस आपल्या जीवनशैलीत काही बदल केल्यास टाळणे शक्य आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar