बँकेकडून ‘स्प्लॅश’ स्पर्धेचे आयोजन संपूर्ण भारतभर कला, हस्तकला आणि साहित्य विषयक वार्षिक स्पर्धा

.

बँकेकडून ‘स्प्लॅश’ स्पर्धेचे आयोजन
संपूर्ण भारतभर कला, हस्तकला आणि साहित्य विषयक वार्षिक स्पर्धा
तंत्रज्ञान आणि भौतिक या दोहोंचे मिश्रण असलेल्या फीजिटल स्पर्धा ‘हरित भारत’ आणि ‘भारत 2030’ या विषयांवर लक्ष केंद्रित करतील
७-१४ वर्षे वयोगटातील मुलांनी कला, हस्त कला आणि साहित्य विषयक स्पर्धांमधून या उपक्रमात सहभागी होतील.
पहिल्या सहा विजेत्यांना प्रत्येकी रुपये एक लाख आणि सहा उपविजेत्यांना प्रत्येकी रुपये ५० हजार एवढे पारितोषिक दिले जाईल.
अंतिम नोंदी नॉन-फंजीबल टोकन (NFT) मध्ये रूपांतरित होतील.
अमर चित्र कथेचे समूह कला संचालक (ग्रुप आर्ट डायरेक्टर) श्री. सॅविओ मास्करेन्हस आणि प्लेशीफू च्या डिझाईन विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सौम्या तिवारी हे अंतिम फेरीचे ज्यूरी असतील.
मुंबई, १३ डिसेंबर, २०२२: भारतातील तिसरी सर्वात मोठी खासगी बँक, एक्सिस बँकेने संपूर्ण भारतभर वय वर्षे ७-१४ या वयोगटातील मुलांसाठी कला, हस्तकला आणि साहित्य या विषयांवर स्पर्धा आयोजित केली आहे. भारतातील सर्व मुलांना या देशव्यापी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी यंदा स्प्लॅश २२-२३ तंत्रज्ञान आणि भौतिक या दोहोंचे मिश्रण असलेल्या फीजिटल स्पर्धा आयोजित करीत आहे. सहभाग घेऊ इच्छिणारे १२ डिसेंबर २२ ते ५ फेब्रुवारी २३ या कालावधीमध्ये https://www.axisbanksplash.in/ यावर नोंदणी करून आपल्या प्रवेशिका भरू शकतात. या वर्षी ही स्पर्धा मुलांना रेखाचित्र, लेखन व हस्त कला या द्वारे आपली सर्जनशीलता आणि कल्पकता सादर करण्यासाठी प्रोत्साहन देईल.
आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मुलांना संवेदनशील करण्याच्या उद्देशाने या वर्षी ही स्पर्धा ७-१० वय वर्ष असलेल्या मुलांसाठी ‘हरित भारत’ आणि ११ ते १४ वय वर्ष असलेल्या मुलांसाठी ‘ भारत २०३०’ या दोन विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मुले प्रवेशिका भरताना खालील विषयांमधून पर्याय निवडू शकतात:
कला- चित्रकला
साहित्य- कथा, कविता किंवा निबंधलेखन
हस्तकला- टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे. आपल्या तयार केलेल्या वस्तूची माहिती त्यांनी लिखित स्वरूपात किंवा ६० सेकंदाचा एक व्हीडिओ बनवून देणे आवश्यक आहे.

या उपक्रमावर भाष्य करताना एक्सिस बँकेचे मुख्य विपणन अधिकारी श्री. अनुप मनोहर म्हणाले, “आम्हाला स्प्लॅश ची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. या उपक्रमाद्वारे मुलांची कल्पनाशक्ती जागृत करून त्यांच्या मनावर खोलवर मूल्ये रुजविण्याचे आणि आपल्याकडून मिळालेल्या या जगाचे संरक्षण व संवर्धन ते कसे करतील हे कलेच्या माध्यमातून त्यांनी सांगावे हे आमचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण देशभरातील सर्व स्तरांच्या मुलांना त्यांच्या कल्पना मांडता यावी आणि त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित करता यावी म्हणून यंदा आम्ही ऑनलाइन, शाळांमध्ये आणि प्रत्यक्ष मैदानांवर असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यापूर्वी या उपक्रमाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून या वर्षी आम्ही ५०० हून अधिक शाळांमध्ये आयोजित करीत आहोत. या तरुण मुलांच्या सर्जनशीलतेतून शिकण्यास आम्ही खरोखरच उत्सुक आहोत.”
एक्सिस बँकेने या मनोरंजक आणि रोमांचक स्पर्धेसाठी मोठमोठ्या शाळा आणि शिक्षणसंस्थांमधील शिक्षण तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांना ज्यूरी पॅनल मध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. उपांत्य फेरीतील स्पर्धकांना प्रख्यात कलाकार व तज्ज्ञांकडून विषयाकडे कसे पहावे , वेळेचे व्यवस्थापन आणि स्क्रीन वर कसे प्रस्तुत करावे या विषयी एक विनामूल्य ऑनलाइन मार्गदर्शन सत्र मिळेल.
अमर चित्र कथेचे समूह कला संचालक (ग्रुप आर्ट डायरेक्टर) श्री. सॅविओ मास्करेन्हस आणि प्लेशीफू च्या डिझाईन विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सौम्या तिवारी यांच्या द्वारे अंतिम विजेत्यांची निवड केली जाईल. वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी रुपये एक लाख आणि उपविजेत्यांना प्रत्येकी रुपये ५०,००० देण्यात येईल. याशिवाय विजेत्या शाळेला ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.
सर्व अंतिम स्पर्धकांच्या कला वस्तूला नॉन फंजिबल टोकन मध्ये रूपांतरित केले जाईल. या उपक्रमासाठी बँकेने बायजुस्, हॅम्ले, प्लेशिफू, आयनॉक्स, नो ब्रोकरहूड, मॅप, इंटेलिजेली, टिन्कल आणि यूनिमो या नामांकित ब्रॅंड सोबत भागीदारी केली आहे.
या स्पर्धेचा निकाल मार्च २

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar