दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते गोवा मुक्तीदिनी ध्वजारोहण !

.

दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते गोवा मुक्तीदिनी ध्वजारोहण !

हरमल:
न्यू इंग्लिश हायस्कूल केरी पेडणे येथे गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या कार्यक्रमाला याच शाळेत यावर्षी गोवा शालेय मंडळाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यापुढे दरवर्षी शाळेतून दहावीत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला गोवा मुक्ती दिनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा नाविन्यपूर्ण पायंडा केरी हायस्कुलने घातला आहे.

यावर्षी दहावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आलेली साक्षी शरद गावडे हिला मुक्तीदिनी प्रमुख पाहुण्या म्हणून केरी हायस्कुलमध्ये उपस्थित राहण्याचा पहिला मान मिळाला. शाळा यावर्षी आपल्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना साक्षी गावडेला हा मान प्राप्त झाला आहे.

याप्रसंगी तिने ध्वजारोहण केल्यानंतर मुलांशी संवाद साधताना साक्षी गावडे म्हणाली, आपण घेतलेल्या खडतर परिश्रमामुळेच आपण शाळेत दहावीच्या परीक्षेत पहिली येऊ शकले. पहिल्या सत्र परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता जिद्दीने लक्षपूर्वक अभ्यास केला त्यामुळेच आपणास अव्वल येणे शक्य झाले. त्यासाठी दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांने जिद्द व चिकाटीने आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अविरतपणे कार्यरत रहावे असा संदेश साक्षीने यावेळी दिला. तसेच शाळेने तिला प्रमुख पाहुण्या म्हणून पाचारण केल्याबद्दल शाळेचे आभार मानले.

शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी साक्षीच्या या यशाबद्दल स्तुती करताना म्हटले, की दहावीत शाळेत पहिला येण्याचा केवढा मोठा सन्मान असू शकतो हे सर्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांच्या सारखेच रोल मॉडेल व्हावे, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन यशाची शिखरे गाठावी हाच शाळेत प्रथम येणाऱ्या मुलाला प्रमुख पाहुण्यांचा मान देण्यामागचा हेतू असल्याचे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे साक्षी गावडेला अलिकडेच शाळेच्या वार्षिक दिनानिमित्त शाळेत ९० टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. यापुढेही जे विद्यार्थी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होतील त्यांना शालेय व्यवस्थापनातर्फे एक लाख रुपये बक्षिसाची योजना चालूच राहणार आहे असेही मुख्याध्यापकानी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व आभार शिक्षिका वैशाली न्हानजी यांनी केले.

फोटो
केरी न्यू इंग्लिश हायस्कुल येथे गोवा मुक्तीदिनी ध्वजारोहण करताना शाळेत दहावी परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी साक्षी गावडे, सोबत मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व शिक्षक.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar