_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धी पत्रक*_ दिनांक : २०.१२.२०२२ _*आल्त-पर्वरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा*_ *विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती* पर्वरी, २० डिसेंबर – क्रूरकर्मा ख्रिस्ती धर्मप्रचारक फ्रान्सिस झेवियर याने २५० वर्षे गोव्यावर इ‌न्क्विझिशन लादले. हिंदूंना अत्यंत क्रूरपणे आणि वेचून ठार मारण्यात आले. अशा विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. आल्त-पर्वरी येथील श्री रामवडेश्वर संस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. चोडणकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोमंतक मंदिर महासंघाचे मुख्य सचिव श्री. जयेश थळी उपस्थित होते. सभेला पू. स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश प्रभु यांनी केला. श्री. चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनरुत्थानासाठी अमुक ठिकाणी मंदिर होते, हे सिद्ध करावे लागणार आहे. हिंदू बहुसंख्य असूनही स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित नसल्याने त्यांच्या समस्यांची नोंद घेतली जात नाही. लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि लँड जिहाद यांच्या माध्यमांतून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी गुप्त कारस्थान रचण्यात आले आहे. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी त्यांचे प्रभावी संघटन उभारणे आवश्यक आहे.’’ या वेळी गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी म्हणाले,‘‘देशाला आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळाले, तरी ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांच्या काळात गमावलेले धार्मिक स्वातंत्र्य हिंदूंना मिळालेले नाही. आपण केवळ राजकीयदृष्ट्या मिळालेल्या स्वातंत्र्यावर समाधानी राहिलो. त्यामुळे सध्या हिंदूंची अवस्था दयनीय झाली आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही. त्यासाठी प्रथम हिंदूंना धर्माचे ज्ञान झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक मंदिरातून धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग असे उपक्रम चालू होणे आवश्यक आहे. देवस्थान समित्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.’’ या सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. सभेची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन सौ. स्वराली दवणे यांनी केले. आपला विश्वासू, *डॉ. मनोज सोलंकी* हिंदु जनजागृती समितीकरिता (संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

.

_

 

_*आल्त-पर्वरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा*_

*विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती*
पर्वरी, २० डिसेंबर – क्रूरकर्मा ख्रिस्ती धर्मप्रचारक फ्रान्सिस झेवियर याने २५० वर्षे गोव्यावर इ‌न्क्विझिशन लादले. हिंदूंना अत्यंत क्रूरपणे आणि वेचून ठार मारण्यात आले. अशा विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. आल्त-पर्वरी येथील श्री रामवडेश्वर संस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. चोडणकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोमंतक मंदिर महासंघाचे मुख्य सचिव श्री. जयेश थळी उपस्थित होते. सभेला पू. स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश प्रभु यांनी केला.
श्री. चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनरुत्थानासाठी अमुक ठिकाणी मंदिर होते, हे सिद्ध करावे लागणार आहे. हिंदू बहुसंख्य असूनही स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित नसल्याने त्यांच्या समस्यांची नोंद घेतली जात नाही. लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि लँड जिहाद यांच्या माध्यमांतून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी गुप्त कारस्थान रचण्यात आले आहे. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी त्यांचे प्रभावी संघटन उभारणे आवश्यक आहे.’’ या वेळी गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी म्हणाले,‘‘देशाला आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळाले, तरी ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांच्या काळात गमावलेले धार्मिक स्वातंत्र्य हिंदूंना मिळालेले नाही. आपण केवळ राजकीयदृष्ट्या मिळालेल्या स्वातंत्र्यावर समाधानी राहिलो. त्यामुळे सध्या हिंदूंची अवस्था दयनीय झाली आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही. त्यासाठी प्रथम हिंदूंना धर्माचे ज्ञान झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक मंदिरातून धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग असे उपक्रम चालू होणे आवश्यक आहे. देवस्थान समित्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.’’ या सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. सभेची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन सौ. स्वराली दवणे यांनी केले.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी*
हिंदु जनजागृती समितीकरिता
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar